राज्यातील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार

 राज्यातील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार

मुंबई, दि. २८ : राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी १ जानेवारी २०११ पर्यंत झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीय आढावा समित्यांवर विविध मतदारसंघांत ११५ सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे सरसकट पाडली जाणार नाहीत, मात्र जी अतिक्रमणे नियमांत बसत नाहीत किंवा सार्वजनिक हिताच्या जागांवर आहेत, ती काढून टाकली जातील. कमाल १,५०० चौरस फुटांपर्यंतचेच निवासी अतिक्रमण नियमित केले जाईल; त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावर केलेले अतिक्रमण पाडण्यात येईल.

नदीपात्र, नाले, गायरान, सार्वजनिक रस्ते, वने, स्मशानभूमी, खेळण्याची मैदाने आणि शाळा किंवा रुग्णालयांसाठी आरक्षित असलेल्या जमिनींवरील अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमित केली जाणार नाहीत. ही अतिक्रमणे हटवून तेथील बाधित कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पर्यायी घरे दिली जातील. कोणत्याही परदेशी नागरिकाचे किंवा बांगलादेशी घुसखोराचे अतिक्रमण नियमित होणार नाही. असे अतिक्रमण आढळल्यास ते हटवण्यासोबतच संबंधितांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *