इटलीतील शाळांमध्ये बुरखा- नकाबवर बंदी

 इटलीतील शाळांमध्ये बुरखा- नकाबवर बंदी

रोम, दि. २८ : इटलीत मेलोनी सरकारने आता शाळांमध्ये बुरखा-नकाबवर बंदी घातली आहे. शाळांमध्ये बुरखा किंवा नकाब घालून आल्यास दंड लागणार आहे. परदेशी विद्यार्थ्यांवर देखील ही मर्यादा घालण्यात आली आहे. सरकारी शाळांमध्ये जर बुरखा घालून यायचं असेल तर येवू नका. असा थेट निर्देश शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी या चर्चेत आल्या आहेत.

शाळेत येताना आपली ओळख झाकता कामा नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हे विधेयक इटलीच्या खालच्या सभागृहात मांडण्यात आलं ते बहुमताने पारित करण्यात आलं आहे. या आधी २० नोव्हेंबरला सिनेटमध्ये याला मंजुरी मिळाली होती. आता सभागृहात पण १४२ मत या बाजूने पडली आहेत. इटलीच्या सरकारने हा कायदा मंजूर केला आहे. या पुढे कपड्याने किंवा बुरख्याने तोंड झाकता येणार नाही. ते असे कोणतीही कापड तोंडावर लावणार नाही ज्याने त्यांची ओळख लपली जाईल. सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेत समान ओळख असली पाहिजे. विद्यार्थी शाळेत आपला चेहरा झाकू शकणार नाहीत. यामुळे शाळेतील वातावरण पण चांगलं राहील.

दरम्यान नव्या शिक्षण कायद्यातील बदलानुसार जे परदेशी विद्यार्थी कोटा आहे. तो आता ३० टक्केच असणार आहेत. जे परदेशी नागरिक इटलीमध्ये राहतात त्यांना विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना इटालियन भाषेचे क्लास लावावे लागतील. यावर शिक्षण मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “परदेशी विद्यार्थांना वेगळं करायचं आमचा हेतू नाही. मात्र त्यांना इटलीची संस्कृती, भाषा आणि सगळ्यांना एकत्रित जोडणार वातावरण रहावं या साठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *