देशाच्या परकीय चलन साठ्याच्या घसरणीला ब्रेक

 देशाच्या परकीय चलन साठ्याच्या घसरणीला ब्रेक

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 8 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात 2.039 अब्ज डॉलरने वाढून 639.516 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली.
त्याआधी एक ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 1.169 अब्ज डॉलरने घटून 637.477 अब्ज डॉलरवर आला होता. याआधी, 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 8.895 अब्ज डॉलरने वाढून 642.453 अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर गेला होता.
रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यासाठी परकीय चलन साठ्यातील (foreign exchange reserves) ही वाढ मुख्यतः परकीय चलन मालमत्तेमध्ये (एफसीए) वाढ झाल्यामुळे झाली, जी एकूण साठ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
रिझर्व्ह बँकेने (RBI) म्हटले आहे की आढाव्या घेण्यात आलेल्या आथवड्यात भारताच्या परकीय चलनाची मालमत्ता (FCA) 1.55 अब्ज डॉलरने वाढून 577.001 अब्ज डॉलर झाली आहे. ड~प्लरमध्ये मोजण्यात येत असलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये परकीय चलन साठ्यात ठेवलेल्या युरो, पाउंड आणि येन सारख्या इतर परकीय चलनांच्या मूल्यामध्ये वाढ किंवा घट झाल्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.
याशिवाय, आढाव्याच्या आठवड्यात सोन्याचा साठा (Gold reserves) 46.4 कोटी डॉलरने वाढून 38.022 अब्ज डॉलर झाला. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेले देशाचे विशेष पैसे काढण्याचे अधिकार (एसडीआर) 2.8 अब्ज डॉलरने वाढून 19.268 अब्ज डॉलर झाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे असलेला देशाचा परकीय चलन साठा 30 लाख डॉलरने घटून 5.225 अब्ज डॉलरवर आला आहे.
 
The country’s foreign exchange reserves rose by 2.0 2.039 billion to 63 639.516 billion in the week ended October 8. The Reserve Bank of India (RBI) said in its latest figures on Friday. Earlier in the week, foreign exchange reserves had declined by 1. 1.169 billion to 63 637.477 billion in the week ended October1.
PL/KA/PL/16 OCT 2021
 

mmc

Related post