भांडवली बाजाराचे सीमोल्लंघन

 भांडवली बाजाराचे सीमोल्लंघन

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बाजाराने पुन्हा एकदा ह्या आठवड्यात नवा विक्रम रचला. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सेन्सेक्सने ६१,००० व निफ्टीने प्रथमच १८,३०० चा टप्पा पार केला.महागाईच्या आकड्यातील घट (retail inflation /wholesale inflation),जागतिक बाजारातील तेजी,IT क्षेत्रातील तेजी.बँकिंग क्षेत्रातील तेजी, रिटेल इन्वेस्टरांचा (retail investors ) वाढता प्रतिसाद, Domestic institutional investors (DIIs) यांचाही बाजारातील खरेदीचा ओघ, टेलिकॉम Production Linked Incentive (PLI) स्कीम साठी ३१ कंपन्यांची नावे जाहीर झाल्याचा परिणाम, फेडच्या संकेतांकडे नजरअंदाज, तसेच दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले राहतील या आशेच्या जोरावर या आठवड्यात देखील बाजाराने कमाल केली.
 
निफ्टीने १८,००० चे नवे विक्रमी शिखर गाठले
 
सोमवारी बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली. परंतु नंतर बाजाराने बढत घेतली. निफ्टीने १८,००० चा ऐतिहासिक आकडा पार केला. ऑटो,पॉवर क्षेत्र आणि रिलायन्स मधील तेजीने हा आकडा पार करण्यास मदत केली. परंतु नंतर बाजारात नफावसुली झाली.आय.टी क्षेत्रात नफावसुली झाली.सेन्सेक्सने ६०,००० च्या वरती बंद होण्यात यश मिळवले. क्रूड ऑइल मध्ये प्रचंड वाढ झाली तसेच रुपयाने डॉलर च्या तुलनेत १५ महिन्याचा तळ गाठला. . बाजार बंद होताना सेन्सेक्स ७६ अंकांनी वधारून ६०,१३५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५० अंकांनी वधारून १७,९४६ चा बंद दिला. Markets erased intraday gains but close at a fresh record high supported by the auto, bank, metal, power, and realty stocks.
 
TCS plunges 7% on lower-than-expected September quarter result
 
प्रचंड चढ उतारानंतर बाजार सकारात्मक बंद. Sensex, Nifty end higher amid volatility.
 
दिवसभरातील प्रचंड चढ उतारानंतर मंगळवारी बाजार बंद होताना सकारात्मक बंद दिला निफ्टीने १८,००० च्या जवळ बंद दिला. जागतिक बाजारातील कमजोर पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. सोमवारी TCS चा तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने टी.सी.एस च्या समभागात जोरदार घसरण झाली,समभाग ७& अधिक घसरला ,मंगळवारी सुद्धा IT क्षेत्रात नफावसुली झाली.PSU banks मध्ये पुन्हा खाजगीकरणाच्या आशेने या समभागात तेजी झाली. metals आणि auto क्षेत्राने बाजार वर खेचण्यास मदत केली. बाजार बंद होताना सेन्सेक्स १४८ अंकांनी वधारून ६०,२८४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४६ अंकांनी वधारून १७,९९२ चा बंद दिला.
 
Retail inflation eases to 4.35% in Sept, IIP grows 11.9% in August
 
सेन्सेक्स व निफ्टीचा विक्रमी बंद. Sensex, Nifty Close At Record After Logging Gains For The Fifth Day.
 
बुधवारी बाजारात तुफानी तेजी होती. निफ्टीने १८,१५० चा टप्पा पार केला .टाटा मोटर्सच्या समभागाने बाजाराला वर जाण्यास मदत केली.Tata Group मधील सगळ्या शेअर्स मध्ये तेजी होती ,Auto,Energy, infra, IT आणि metal ह्या क्षेत्रात तेजी होती. IIP आणि किरकोळ महागाईच्या आकड्यात सुधार झाल्याचा बाजाराला फायदा झाला.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४५२ अंकांनी वधारून ६०,७३७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १६९ अंकांनी वधारून १८,१६१ चा बंद दिला.
 
Infosys Q2 Results- Net profit jumps 11.9%
 
Wipro Q2 Result – Profit falls 9.6%
 
सेन्सेक्सने केला ६१,००० चा टप्पा पार,निफ्टीनेही १८,३०० चा स्तर गाठला.
 
सलग चवथ्या दिवशी बाजाराची कमान बुल्सच्या हातात होती. जागतिक बाजारती. तेजीची बाजाराला साथ लाभली. बाजार उघडताच सेन्सेक्सने नवा विक्रम रचला प्रथमच सेन्सेक्सने ६१,००० टप्पा पार केला. IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी INFOSYS चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले जाहीर झाल्याने, IT क्षेत्रात तेजीचे वातावरण होते.जवळपास सगळ्या क्षेत्रात तेजी होती.निफ्टीने प्रथमच १८,३०० ची लेवल पार केली.सेन्सेक्स व निफ्टीने विक्रमी बंद दिला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५६८ अंकांनी वधारून ६१,३०५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १७६ अंकांनी वधारून १८,१६१ चा बंद दिला.
 
शुक्रवारी दसऱ्या निमित बाजाराचे कामकाज बंद होते.
 
जितेश सावंत
 
शेअर बाजार तज्ञ,
 
Technical and Fundamental Analyst-Stock Market
 
jiteshsawant33@gmail.com
ML/KA/PGB
16 Oct 2021
 
 
 
 

mmc

Related post