रिझर्व्ह बँक डिजिटल चलनाशी संबंधित पथदर्शी प्रकल्प सुरु करणार ?

 रिझर्व्ह बँक डिजिटल चलनाशी संबंधित पथदर्शी प्रकल्प सुरु करणार ?

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पथदर्शी प्रकल्प म्हणून डिजिटल चलन (digital currency) सुरु करू शकते. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) बँकिंग आणि आर्थिक परिषद कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हे सांगितले.

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक पी. वासुदेवन यांनी यासंदर्भात सांगितले की, त्यांना असे वाटते की काही लोकांकडून असे म्हटले जात होते की, किमान पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत, डिजिटल चलनासंदर्भात (digital currency) एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला जाऊ शकतो. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत डिजिटल चलनावरील पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत.

भारताच्या मध्यवर्ती बँकेकडून जारी करण्यात येणारे हे डिजिटल चलन (digital currency), किंवा सीबीडीसी, मुळ रुपाने भारतासाठी फिएट चलनांची डिजिटल आवृत्ती आहे. भारतासाठी, हे देशांतर्गत चलन रुपया म्हणूनच वापरले जाईल. तत्पूर्वी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर म्हणाले होते की, डिसेंबर पर्यंत सीबीडीसीच्या सॉफ्ट लॉन्चची अपेक्षा केली जाऊ शकते, परंतु रिझर्व्ह बँकेकडून अद्याप ते सुरु करण्यासाठी कोणतीही अधिकृत वेळ मर्यादा सांगण्यात आलेली नाही.

ते सुरु करण्याबाबत वासुदेवन म्हणाले की, ते त्याच्या लॉन्चिंगवर काम करत आहेत आणि ते सीबीडीसीशी संबंधित विविध मुद्दे आणि बारकावे तपासत आहेत. सीबीडीसीची लगेचच सवय होईल असे म्हणता येणार नाही. ते कसे अंमलात आणले जाते यावर ते सुरु करण्याची भूमिका अवलंबून आहे. ते सुरु करण्यासाठी कोणतीही घाई करू इच्छित नाही. सीबीडीसी शी संबंधीत प्रत्येक पैलूची रिझर्व्ह बँके द्वारे छाननी केली जात आहे यामध्ये किरकोळ सत्यापन आणि वितरण व्यवस्था सारख्या क्षेत्रांचा देखील समावेश आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुख्य महाव्यवस्थपकांनी सांगितले की मध्यस्थांना पूर्णपणे बाजुला सारता येईल का याचीही मध्यवर्ती बँक तपासणी करत आहे. तसेच रिझर्व्ह बँक ते विकेंद्रित किंवा अर्धकेंद्रित तंत्रज्ञानावर सुरु करण्याचा विचार करत आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने अनेक वेळा क्रिप्टोकरन्सीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

The Reserve Bank of India (RBI) may launch digital currency as a pilot project in the first quarter of next financial year. This was stated by a senior Reserve Bank official at the State Bank of India’s (SBI) Banking and Economic Council program.

PL/KA/PL/19 NOV 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *