लवकरच डिजिटल चलन आणण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा

 लवकरच डिजिटल चलन आणण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लवकरच डिजिटल चलन (Digital Currency) आणण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक हे चलन केवळ त्याच्या फायद्यामुळेच आणू इच्छित नाही तर सर्वोच्च न्यायालयाचेही त्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 6 एप्रिल 2018 रोजी भारतात क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या व्यापारावर स्थगिती दिली होती.
वास्तविक, क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) पैशांची गुंतवणूक करणे सुरक्षित नाही आणि ते भारतीय कायद्याच्या कार्यक्षेत्राबाहेरही आहे, म्हणून रिझर्व्ह बँकेने (RBI) हे निर्बंध घातले होते. मार्च 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेच्या स्थगितीविरोधात निकाल दिला आणि स्थगिती उठवली होती. आता भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेसमोर बिटकॉईनला कायदेशीर चौकटीत आणणे हा एकमेव पर्याय आहे. अशा परिस्थितीत भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने मिळून भारताचे स्वतःचे डिजिटल चलन (Digital Currency) आणण्याचा निर्णय घेतला आहे.

भौतिक चलनाच्या तुलनेत अनेक फायदे
Many advantages over physical currency

भौतिक चलन (physical currency) चोरी, खराब होण्याची भीती असते. त्याची देखभाल देखील अधिक ठेवावी लागते. दुसरीकडे, जर हे पैसे डिजिटल स्वरूपात असतील तर त्याच्या देखभालीसाठी कमी खर्च होईल आणि त्याचा मागोवा घेणे खूपच सोपे होईल. दुसरीकडे, जर आपण त्याच्या मूल्याबद्दल बोललो तर 10 रुपयांच्या नोटेचे जेवढे मुल्य आहे तेवढेच मुल्य 10 रुपयांच्या डिजिटल चलनाचे असेल. डिजिटल चलन आल्यानंतर कदाचित हळूहळू यंत्रणेमधून नोटा संपू शकतात.

ना नोटा छापण्याची गरज – ना खोट्या खर्‍याची भीती
No need to print notes – no fear of false positives

डिजिटल चलनामुळे (Digital Currency) सरकारला नोटा छापण्याच्या त्रासातून मुक्ती मिळु शकते, परंतु त्याला अनेक वर्षे लागतील. भौतिक ते डिजिटल पर्यंत जाण्यास बराच काळ लागू शकतो, कारण भारतात प्रत्येकजण डिजिटलला चांगल्या पद्धतीने समजू शकत नाही. डिजिटल चलनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे खर्‍या आणि खोट्या नोटांचा त्रास संपुष्टात येईल. मात्र अशा परिस्थितीत सरकारला सायबर सुरक्षेकडे बरेच लक्ष द्यावे लागेल.

कर चोरी कमी होऊ शकते
Tax evasion can be reduced

जर आपण सध्याच्या परिस्थितीबाबत बोललो तर रोकड कुठे जाते याचा मागोवा घेणे फारच अवघड असते. कोणतीही व्यक्ती एखाद्याला रोख रक्कम देते तर त्याची कोणतीही नोंद नसते, परंतु डिजिटल चलनात (Digital Currency) त्याचा मागोवा घेणे खूप सोपे होईल. याचा परिणाम असा होईल की काळा पैसा (Black Money) रोखला जाईल आणि कर चोरीमुळे सरकारच्या उत्पन्नातील तोटाही कमी होऊ शकेल किंवा कदाचित हळूहळू तो संपुष्टातही येईल.

डिजिटल चलनाचे तोटे देखील आहेत
There are also disadvantages to digital currency

भौतिक चलनाच्या (physical currency) तुलनेत डिजिटल चलनाचे केवळ फायदेच नाहीत तर काही तोटे देखील आहेत. त्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याचे सायबर चोरांपासून संरक्षण करावे लागेल. ज्याप्रमाणे सध्या नोटांची सुरक्षा करावी लागते, त्याच पद्धतीने नंतर डिजिटल चलनाचे रक्षण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या तयार रहावे लागेल. दुसरीकडे, व्यवहारात तांत्रिक समस्या आली तर सर्व व्यवहार थांबतील, ज्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो.
The Reserve Bank of India (RBI) has announced the introduction of Digital Currency soon. The Reserve Bank wants to bring in the currency not only for its own benefit, but also for the Supreme Court. The Reserve Bank of India had on April 6, 2018 suspended the trading of cryptocurrency Bitcoin in India.
PL/KA/PL/24 JULY 2021
 

mmc

Related post