सुरुवातीच्या पडझडीनंतर भांडवली बाजार(Stock Market) स्थिरावला आठवडयाचा शेवट तेजीने.

 सुरुवातीच्या पडझडीनंतर भांडवली बाजार(Stock Market) स्थिरावला आठवडयाचा शेवट तेजीने.

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजारात खूप चढउतार होते. बाजारावर महागाई आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती ,जागतिक बाजारातील प्रचंड चढउतार,फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्सची (FPI) जुलै महिन्यातील विक्री,संसदेचे पावसाळी अधिवेशन(Parliament monsoon session ) ,रुपयातील चढउतार,तसेच तिमाही निकाल या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी. The market was very volatile this week. Inflation and fears of the third wave of the corona, huge fluctuations in global markets, Sale of shares by Foreign Portfolio Investors (FPI) in July, the monsoon session of Parliament, rupee fluctuations, and quarterly results have all contributed to this. Investors should be cautious in the future and invest only at low levels in the long run

 

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी बाजारात १% पेक्षा जास्त घसरण. Sensex, Nifty fall a percent each; banks, financials top drags

विदेशी बाजारातील कमजोर संकेतामुळे आठवडयाच्या  पहिल्याच दिवशी बाजारात चांगलीच घसरण झाली. महागाई आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने जागतिक  बाजार गडगडला व त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटले.सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला.भारतीय बाजार आपल्या विक्रमी स्तरावर कामकाज करीत असल्याने त्याचे मूल्यांकन(valuation)देखील जास्त असल्याची भावना बाजारात निर्माण झाली.मार्केटमध्ये तेजीवाले व मंदीवाले(bulls and bears) यांची टक्कर झाली. निफ्टीमध्ये ३०एप्रिल नंतर म्हणजेच ११ आठवडयानंतर सर्वाधिक घसरण झाली. रुपयाची सुरुवात देखील नरमाईने झाली.फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्सनी (FPI) जुलै महिन्यात आत्तापर्यंत जवळजवळ ४,५०० करोडपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत. सोमवारी बाजारात बँकिंग,मेटल,आणि ऑटो या क्षेत्रात विक्री झाली. HDFC twins, IndusInd Bank, Axis Bank, Kotak Mahindra Bank आणी ICICI Bank या शेअर्स मधील पडझडीमुळे बाजारात दबाव वाढला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५८६ अंकांनी घसरून ५२,५५३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १७१ अंकांनी  घसरून १५,७५२ चा बंद दिला. Sensex, Nifty Close Lower For A Second Day

सोमवार पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. The Parliament monsoon session began from Monday.

 

धातू व वित्तीय क्षेत्रातील समभागाच्या घसरणीमुळे सलग तिसऱ्या दिवशी बाजारात पडझड. Markets end lower for the third consecutive session dragged by the metal, realty and financial names.

खराब जागतिक संकेतामुळे मंगळवारी भारतीय बाजारात चहूबाजूंनी विक्रीचा मारा झाला,सोमवारी अमेरिकन बाजारात ऑक्टोबर नंतरची सगळ्यात मोठी पडझड झाली DOW JONES मध्ये ७००अंकापेक्षा जास्त घसरण झाली.डेल्टा विषाणूचा वाढत प्रभाव व संभाव्य टाळेबंदीची भीती यामुळे अमेरिकन मार्केट चांगलेच गडगडले ,याचे पडसाद मंगळवारी आशियाई बाजारात दिसले.रुपयाची सुरुवात देखील कमजोरीने झाली.दिग्गज कंपन्यांसहित छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये चांगलीच पडझड झाली.अमेरिकेन बाजारचा निर्देशांक DOW JONESच्या Future मधल्या तेजीमुळे  दुपारनंतर बाजारात थोडी खरेदी झाली HUL, INFOSYS, ASIAN PAINTS आणी  TCS या शेअर्समधील वाढीने बाजार स्थिरावला.सिमेंट क्षेत्रातील समभागातही तेजीचा माहोल होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३५४ अंकांनी घसरून ५२,१९८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १२० अंकांनी घसरून १५,६३२ चा बंद दिला. Sensex, Nifty End Lower For Third Day As Earnings Off To Shaky Start.

बुधवारी बकरी ईद निमित्त बाजाराचे कामकाज बंद राहिले. The market was closed on Wednesday on the occasion of Eid.

जागतिक बाजारातील तेजीमुळे भारतीय बाजारात जोश. Markets bounce back and end with over a percent gain on the back of positive global cues.

अमेरिकन बाजारात पडझडीनंतर दोन दिवसात ८०० अंकांची तेजी आली यामुळे गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात तेजीने झाली.गुंतवणूकदारांमध्ये जोश होता तेजीवाल्यांची बाजारावर चांगलीच पकड होती.सेन्सेक्स ६३९ अंकांनी वाढला.दोन दिवसांचे नुकसान बाजाराने काही अंशी भरून काढण्याचा प्रयत्न केला.मेटल(Metal),पॉवर(Power) आय.टी(I.T).आणि रिअल इस्टेट(Real Estate), या क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराला आधार मिळाला. JSW Steel, Tech Mahindra, Bajaj Finance, Bharti Airtel आणी   Bajaj Finserv  Nifty चे सर्वोत्कृष्ट तेजीवाले राहिले तर  HUL, Asian Paints, Bajaj Auto, Cipla आणी  Britannia मंदीवाले राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६३९ अंकांनी वधारून ५२,८३८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १९१ अंकांनी वधारून १५,८२४ चा बंद दिला. Sensex, Nifty Log Best Single-Day Gains In Two Months.

आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात मजबूत झाली. जागतिक बाजारात संमिश्र वातावरण होते.रुपयाची सुरुवात कमजोरीने झाली. बाजाराचे लक्ष घरापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्याची ऑन लाईन सेवा देणाऱ्या झोमॅटो या कंपनीच्या लिस्टिंगकडे होते. या शेअर्सची सुरुवात चमकदार झाली(Food delivery giant Zomato had an impressive debut) .रिअल इस्टेट(Real Estate),बँकिंग(Banking) ,एफएमसीजी(FMCG),या क्षेत्रात खरेदी झाली. मिडकॅप आय.टी क्षेत्रात सुद्धा खरेदीचा जोर होता. आय.टी इंडेक्स विक्रमी स्तरावरती बंद झाला. सुरुवातीच्या तेजीनंतर मेटल क्षेत्रात नफावसुली दिसून आली.. बाजार बंद होताना सेन्सेक्स १३९ अंकांनी वधारून ५२,९७६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३२ अंकांनी वधारून १५,८५६ चा बंद दिला. Markets end higher for the second consecutive day led by the financial names. Markets swiftly rise in noon deals to end near the day’s high level.

रिलायन्सच्या पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर तिमाही आधारावर नफा 7.2 टक्क्यांनी घसरून 12273 कोटी रुपये झाला. RIL Q1 results Consolidated net profit falls 7% to Rs 12,273 crore

After the initial fall, the stock market stabilized over the weekend.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com  

JS/KA/PGB
24 July 2021

mmc

Related post