कार्ड पेमेंटसाठी रिझर्व्ह बँकेने आणला हा नियम

 कार्ड पेमेंटसाठी रिझर्व्ह बँकेने आणला हा नियम

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्राहकांचा डेटा अधिक सुरक्षित करण्यासाठी 1 जानेवारीपासून रिझर्व्ह बँकेचा (RBI) एक नवा नियम लागू होणार आहे. नवीन नियमानुसार, येत्या वर्षाच्या सुरुवातीला डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटच्या (card payment) नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. पुढील वर्षापासून, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी रिझर्व्ह बँक तुमच्या कार्डला एक टोकन नंबर देईल. त्याद्वारे ग्राहक पेमेंट करू शकतील.

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदीकडे कल झपाट्याने वाढला आहे. लहान दुकान असो किंवा शॉपिंग मॉल, बहुतांश लोकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे (card payment) देण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या कार्डचा डेटा एखाद्या कंपनी किंवा व्यापाऱ्याला देतो आणि हा व्यापारी किंवा कंपनी आपला डेटा संग्रहित करते. त्यामुळे डेटा चोरीची शक्यता वाढते. अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (RBI) एक नवीन नियम आणला आहे, ज्यात ती कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा एक टोकन क्रमांक देईल, ज्याला टोकनायझेशन असे म्हटले जात आहे.

नवीन नियमानुसार 1 जानेवारी 2022 पासून कोणतीही कंपनी किंवा व्यापारी ग्राहकांच्या कार्डची माहिती जसे की कार्ड नंबर, अंतीम मूदत किंवा सीव्हीव्ही क्रमांक संग्रहित करु शकणार नाही.
रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व कंपन्यांना त्यांनी ग्राहकांचा आधीपासून संग्रहित केलेला डेटा डिलीट करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षा वाढवता येईल.
रिझर्व्ह बँकेने व्हिसा, मास्टरकार्ड आणि रुपे कार्ड जारी करणाऱ्या बँक किंवा कंपनीच्या वतीने एक टोकन जारी करण्यास मान्यता दिली आहे, ज्याला टोकनायझेशन म्हणतात.
नवीन वर्षापासून, तुम्हाला कोणतेही तपशील न देता पेमेंट (card payment) करण्यासाठी टोकनायझेशनचा पर्याय निवडावा लागेल.
अशा प्रकारे, ग्राहकांचे कार्ड तपशील व्यापाऱ्याकडे संग्रहित होणार नाहीत, ज्यामुळे डेटा चोरी आणि फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल.

A new RBI rule will come into effect from January 1 to make customer data more secure. Under the new rules, there will be a major change in the rules for debit and credit card payments early next year. From next year, the Reserve Bank will give your card a token number to pay by debit or credit card. That way customers can make payments.

PL/KA/PL/23 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *