बँकाच्या अनुत्पादित मालमत्ता कमी होत आहेत

 बँकाच्या अनुत्पादित मालमत्ता कमी होत आहेत

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बँकांच्या अनुत्पादित मालमत्तांमध्ये (Non-Performing Assets) घट झाली आहे. बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता मार्च 2021 मध्ये 8.2 टक्क्यांवरून कमी होऊन 7.3 टक्के आणि सप्टेंबर 2021 मध्ये 6.9 टक्क्यांवर आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग क्षेत्राबाबत (Banking Sector) जाहीर केलेल्या बँकिंग क्षेत्राचा कल आणि प्रगती 2020-21 या अहवालात याबाबत सांगितले आहे. अहवालानुसार, बँकांच्या उत्पन्नात स्थैर्य आणि खर्चात घट झाल्यामुळे मालमत्तेवरील परताव्यात सुधारणा दिसून आली आहे, जी मार्च 2020 मधील 0.2 टक्क्यांवरून मार्च 2021 मध्ये 0.7 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

बँकिंग क्षेत्रावर कोरोना साथीचा परिणाम नाही
Corona pandemic has no effect on the banking sector

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अहवालानुसार, कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवल्यामुळे जागतिक आर्थिक घडामोडी आणि व्यापारात सुधारणा होत आहे. तसेच, स्थिर मालमत्तेची गुणवत्ता आणि भक्कम धोरणात्मक समर्थन यामुळे जगभरातील बँकिंग क्षेत्रावर कोरोना साथीचा कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, धोरणकर्त्यांनी पाठिंबा काढून घेतल्यास बँकिंग क्षेत्रावर पुन्हा संकट येऊ शकते. ज्यामुळे मालमत्तेची गुणवत्ता आणि नफा या दोन्हीवर साथीमुळे परिणाम होईल.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालात डिजिटल चलनाचाही उल्लेख
Digital currency is also mentioned in the RBI report

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) बँकिंग क्षेत्राबाबत (Banking Sector) अहवालात डिजिटल चलनाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अहवालानुसार, सध्या उपलब्ध असलेल्या चलन पर्यायाच्या तुलनेत रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल चलनाचे लोकांना अनेक फायदे होऊ शकतात, ज्यामध्ये स्वीकार्यता, व्यवहार करण्यात सुलभता, जलद तोडगा यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. अहवालानुसार, भारताने पेमेंट सिस्टममध्ये जी प्रगती साधली आहे ती सेंट्रल बँक डिजिटल चलनाची मजबूत ढाल बनण्यास मदत करेल. एका देशाच्या दुसर्‍या देशाशी डिजिटल चलनाद्वारे व्यवहारांवर अहवालात असे नमूद केले आहे की मध्यवर्ती बँक डिजिटल चलन सीमापार पेमेंटला गती देईल आणि संबंधित बँकांना पर्याय म्हणून ते उदयास येईल.

Non-performing assets of the country’s banks have declined. Non-performing assets of banks declined to 7.3 per cent from 8.2 per cent in March 2021 and 6.9 per cent in September 2021. This is stated by the Reserve Bank of India (RBI) in its Trends and Progress of Banking Sector 2020-21 Report.

PL/KA/PL/29 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *