अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार असल्याचा न्यायालयीन चौकशीचा अहवाल

बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटर प्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार असल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असून आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे. तसेच बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे.एन्काऊंटर फेक आहे हा अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांचा दावा खरा आहे, असंही यात म्हटलं आहे.