गुप्तधन हव्यासापोटी पुरातन वास्तू परिसरात जागोजागी खड्डे

 गुप्तधन हव्यासापोटी पुरातन वास्तू परिसरात जागोजागी खड्डे

बुलडाणा, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सिंदखेडराजा हे माँ जिजाऊसाहेबांचं माहेर अर्थात राजे लखोजी जाधव यांचे गाव आहे . या परिसरात अनेक पुरातन वास्तू असून राजे लखोजी जाधव यांचं मूळ गाव असलेले आडगावराजा याच परिसरात आहे. त्यामुळे या परिसरात त्याकाळातील अनेक पुरातन वास्तू आहेत.

या सर्व वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. मात्र या पुरातन वास्तूंवर गुप्तधन शोधणाऱ्या टोळीची वक्र नजर पडली आहे. या परिसरातील पुरातन वास्तू परिसरात गुप्तधन असेल , सोने असेल या लालसेतून काही जण वास्तूंच्या आजूबाजूला कधी आमावस्येला तर कधी गुरुवारी रात्रीच्या वेळेस मोठे खड्डे खोदून गुप्तधन शोधत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे .

यामुळे या परिसरातील अनेक पुरातन वास्तूंच्या अस्तित्वाचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे पुरातत्व विभाग व जिल्हा प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक जिजाऊ भक्तांनी केला आहे.

या ऐतिहासिक परिसराचे नुकसान करून नका अशी विनंती स्थानिक जिजाऊ भक्तांनी केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी याकडे सरकार आणि पुरातत्त्व विभागाने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. Pits at places in the area of ancient buildings for the sake of hidden wealth

ML/KA/PGB
9 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *