पतंजली मिरची पावडरमध्ये आढळली किटकनाशके. FSSAI ची कारवाई

नवी दिल्ली. दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुर्वेदीक औषध निर्मिती कंपनी म्हणून उदयास आलेल्या आणि नंतर FMCG मार्केट, किराणा माल विक्रीमध्ये उतरलेल्या पतंजली आयुर्वेद या कंपनीचे बरेचसे प्रॉडक्ट आता दिवसेंदिवस वादात अडकत आहेत. पतंजली उद्योगसमुहातर्फे तयार करण्यात आलेल्या अनेक उत्पादनांवर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आक्षेप नोंदवले जात आहेत. त्यांच्या उत्पादनांचा दर्जा त्यातील भेसळ या बाबतीतही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात आता पतंजलीच्या मिरची पावडरची भर पडली असून अन्न औषध प्रशासनाने त्यांची एक बॅचच बाजारातून परत मागवली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने पतंजली मिरचीची एक बॅच परत मागवण्याचा आदेश १३ जानेवारी रोजी दिला आहे. या मिरचीमध्ये किटकनाशके, टॉक्सीन द्रव्यांचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक आढळल्याने ही बॅच परत मागवण्यात आली आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीने मात्र या बाबत आपली कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. अन्न व औषध प्रशासनाने १३ जानेवारी रोजी हा आदेश दिला होता. त्यानुसार कंपनीच्या मिरची पावडरची एक बॅच परत मागवण्यात आली आहे.
SL/ML/SL