जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पर्याय काढणे सुरू

 जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पर्याय काढणे सुरू

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकार नकारात्मक नाही मात्र भविष्याचा विचार करता यासाठी व्यवहार्य पर्याय देण्याच्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.

काँग्रेसचे राजेश राठोड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.
या मुद्द्यावर भावनिक न होता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. चालू अधिवेशन संपल्यानंतर सर्व मान्यताप्राप्त राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनांची भेट घेऊन त्यांच्याकडील व्यवहार्य पर्याय जाणून घेऊन त्यातून मार्ग काढला जाईल असं त्यांनी सांगितलं. Option to implement old pension scheme started

ही जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करायची असेल तर आर्थिक ताळेबंद कसा राखायचा हा प्रश्न आहे. आज ही घोषणा केली तर याचे परिणाम आता जाणवणार नाहीत मात्र आणखी दहा वर्षांनी आर्थिक स्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं फडणवीस यांनी सांगितलं.

सरकार कोणाचंही असो पण भविष्यात राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन यावर अभ्यास सुरू आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

ML/KA/PGB
3 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *