कांदा खरेदी केंद्रे आता बाजार समितीच्या आवारातही

 कांदा खरेदी केंद्रे आता बाजार समितीच्या आवारातही

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजवर नाफेड मार्फत १८,७४३ क्विंटल कांदा खरेदी करण्यात आली आहे, ही खरेदी केंद्रे बाजार समितीत ही सुरू करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली .

छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला बाळासाहेब थोरात आणि सुनील केदार यांनी अनुमोदन दिलं होतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेमकी किती मदत द्यायची यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल लवकर घेऊन त्याबाबतची घोषणा केली जाईल असे ही फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांचा सभात्याग

आठ वर्षांपासून थकबाकी दार असणाऱ्यांचाच केवळ वीज पुरवठा खंडित केला जात आहे, शेतकऱ्यांची वीज तोडण्याचे आदेश अजिबात दिलेले नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, शेतकऱ्यांची वीज खंडित केली जात आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी विधानसभेत केली होती त्यावर फडणवीस यांनी ही ग्वाही दिली, हा केवळ राजकीय आरोप असल्याचं ते म्हणाले. यावर घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.

ML/KA/SL

2 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *