भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दुहेरी आकड्यात होईल – निती आयोगाच्या उपाध्यक्षांचे मत

 भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दुहेरी आकड्यात होईल – निती आयोगाच्या उपाध्यक्षांचे मत

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) 10 टक्क्यांहून अधिक विकास दर (Growth Rate) नोंदवेल, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की भारताचा विकास दर मजबूत आहे आणि निर्गुंतवणुकीचे वातावरण सुधारले आहे. देश कोरोनाच्या तिसर्‍या संभाव्य लाटेला सामोरे अधिक चांगल्या पद्धतीने सज्ज आहे त्याचबरोबर, राज्यांनी देखील गेल्या दोन लाटांदरम्यान साथीला तोंड देण्याचे धडे घेतले आहेत यावरही कुमार यांनी भर दिला.

जीडीपीचा अंदाज सुधारावा लागेल
GDP estimates need to be revised

निती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले की अर्थव्यवस्थेतील सुधारणा खूप मजबूत आहे आणि ज्या संस्थांनी चालू आर्थिक वर्षासाठी आपला सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) अंदाज कमी केला होता, त्यामध्ये त्यांना त्यामध्ये आता सुधारणा करुन तो वाढवावा लागेल. ते म्हणाले की 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian economy) दुहेरी अंकांचा (दहा टक्के किंवा त्याहून अधिक) विकास दर (Growth Rate) नोंदवेल अशी अपेक्षा आहे.
गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) 7.3 टक्क्यांनी घसरली आहे. पतमानांकन संस्थांपैकी एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने चालू आर्थिक वर्षाच्या भारताच्या विकास दराचा (Growth Rate) अंदाज 11 वरून कमी करुन 9.5 टक्के केला आहे. फिच रेटिंग्जने देखील आपल्या विकास दराचा अंदाज 12.8 वरून कमी करुन 10 टक्के केला आहे.

सुधारणांची गती मंदावल्यामुळे विकास दराचा अंदाज कमी
The slowdown in reforms has slowed the growth rate forecast

पतमानांकन संस्थांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सुधारणांची गती मंदावली असल्यामुळे आपला विकास दराचा (Growth Rate) अंदाज कमी केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. खासगी गुंतवणूकीला वेग येईल का असे विचारले असता कुमार म्हणाले की लोखंड, सिमेंट आणि रिअल इस्टेट यासारख्या काही क्षेत्रांच्या क्षमता विस्तारात आधीच लक्षणीय गुंतवणूक दिसून येत आहे.

सरकार आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करेल
The government will strengthen infrastructure in the health sector

कुमार यांनी सांगितले की, सरकारची तयारी खुपच उल्लेखनीय आहे आणि त्याच बरोबर राज्यांनीही साथीमधून चांगला धडा घेतला आहे. सरकारने अलीकडेच 23,123 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे. या माध्यमातून सरकार प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रातील (Health sector) पायाभूत सुविधा मजबूत करेल. चालू आर्थिक वर्षात सरकार आपल्या निर्गुंतवणुकीचे (Disinvestment) लक्ष्य गाठू शकेल का, असे विचारले असता कुमार म्हणाले की, दुसरी लाट असतानाही बाजारपेठ खुपच मजबूत आहे. सध्या ती नव्या उंचीवर आहे.
In the current financial year, the Indian economy will report a growth rate of more than 10 per cent, said Rajiv Kumar, vice-chairman of the policy commission. He said India’s growth rate is strong and the disinvestment environment has improved. The country is better equipped to deal with the third wave of corona
PL/KA/PL/12 JULY 2021
 

mmc

Related post