जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.26 टक्के

 जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.26 टक्के

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) जूनमध्ये किरकोळ महागाई दर 6.26 टक्के होता. अशाप्रकारे मे महिन्याच्या तुलनेत पहायचे झाले तर किरकोळ महागाई दरात (Retail Inflation) किंचित घट झाल्याचे पहायला मिळाले आहे. या वर्षी मे मध्ये किरकोळ महागाई दर 6.3 टक्के होता. अशाप्रकारे, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) (CPI) वर आधारित महागाई दर जूनमध्येही रिझर्व्ह बँकेच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त राहिला आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. राष्ट्रीय सांख्यिक कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जून 2021 मध्ये अन्नधान्यांच्या वस्तूंच्या महागाईचा दर 5.15 होता जो मेमध्ये 5.01 टक्के होता.

मेच्या आयआयपी आकडेवारीमध्ये सुधारणा
Improvements in May IIP figures

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आयआयपी आकडेवारीत असे सांगण्यात आले आहे की मे महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात 29.3 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मेमध्ये आयआयपीमध्ये 33.4 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी मे, 2021 मध्ये उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात 34.5 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. आढावा घेण्यात आलेल्या महिन्यात खाण क्षेत्राच्या उत्पादनात 23.3 टक्के आणि वीज निर्मितीत 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Retail inflation stood at 6.26 per cent in June. Thus, compared to the month of May, retail inflation has declined slightly. Retail inflation was 6.3 per cent in May this year. Thus, inflation based on the Consumer Price Index (CPI) remained above the Reserve Bank’s target in June.
PL/KA/PL/13 JULY 2021
 

mmc

Related post