Retail Inflation: किरकोळ महागाई जानेवारीत 6.01 टक्क्यांवर

 Retail Inflation: किरकोळ महागाई जानेवारीत 6.01 टक्क्यांवर

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किरकोळ महागाईने (Retail Inflation) जानेवारीत नवा उच्चांक गाठला. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई दरात सातत्याने वाढ होत आहे. जानेवारीमध्ये ती 6.01 टक्क्यांवर पोहोचली, तर डिसेंबरमध्ये ती 5.66 वर होती. रिझर्व्ह बँकेने वार्षिक आधारावर निश्चित केलेल्या महागाई लक्ष्यापेक्षाही ती जास्त आहे.

याव्यतिरिक्त गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) 5.66 टक्के होता, तर जानेवारीत तो 4.06 टक्क्यांवर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार (NSO) जानेवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांची महागाई (Retail Inflation) 5.43 टक्क्यांवर पोहोचली. डिसेंबरमध्ये हा दर 4.05 टक्के होता.

रिझर्व्ह बँक, चलनविषयक धोरणाचा विचार करताना, प्रामुख्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई लक्षात घेते. किरकोळ महागाईचा  दर दोन टक्क्यांच्या फरकाने चार टक्के राखण्याची जबाबदारी सरकारने मध्यवर्ती बँकेला दिली आहे.

Retail inflation hit a new high in January. According to data released by the government, the rise in food prices in the last month has led to a steady rise in retail inflation. In January, it was 6.01 per cent, while in December it was 5.66 per cent. It is even higher than the inflation target set by the Reserve Bank on an annual basis.

PL/KA/PL/15 FEB 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *