खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई वाढली

 खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई वाढली

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑक्‍टोबर महिन्यात किरकोळ महागाईच्या (Retail Inflation) आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दर किरकोळ वाढून 4.48 टक्क्यांवर पोहोचल्याचे सरकारी आकडेवारीत सांगण्यात आले आहे.

ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई (Retail Inflation) सप्टेंबर मध्ये 4.35 टक्के आणि ऑक्टोबर 2020 मध्ये 7.61 टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई ऑक्टोबरमध्ये वाढून 0.85 टक्क्यांवर पोहोचली आहे, जी त्याच्या मागील महिन्यात 0.68 टक्क्यांवर होती.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने सीपीआय-आधारित महागाई 4 टक्क्यांवर ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यात दोन टक्क्यांचा कमी अधिक फरक असू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, सीपीआय महागाई 2021-22 मध्ये सुमारे 5.3 टक्के असेल. त्यानंतर, आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल ते जून तिमाहीत किरकोळ महागाई (Retail Inflation) 5.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

देशाचे औद्योगिक उत्पादन (आयआयपी) सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 3.1 टक्क्यांनी वाढले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO)जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2021 मध्ये उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 2.7 टक्क्यांनी वाढले. ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादनात 11.9 टक्के वाढ झाली होती.

October has been hit hard by retail inflation. According to official data, food inflation rose marginally to 4.48 per cent in October on account of higher food prices. Retail inflation, as measured by the Consumer Price Index (CPI), was 4.35 per cent in September and 7.61 per cent in October 2020.

PL/KA/PL/13 NOV 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *