अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कर अधिकार्‍यांची कान उघडणी

 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कर अधिकार्‍यांची कान उघडणी

बेंगळुरू, दि.08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी करदात्यांच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्याबद्दल कर मंडळांना धारेवर धरले. अर्थमंत्र्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क (CBIC) यांना तक्रारींच्या सुनावणीसाठी कर अधिकाऱ्यांनी शनिवारचा दिवस राखून ठेवण्याचे निर्देश दिले. सीतारामन यांनी बंगळुरूमध्ये अर्थसंकल्पोत्तर चर्चेदरम्यान कर कपातीशी संबंधित एका प्रश्नावर ही प्रतिक्रिया दिली.

कर्नाटक बँकेचे सरव्यवस्थापक आणि मुख्य वित्तीय अधिकारी मुरलीधर राव यांनी वस्तू आणि सेवा कर (GST) कायद्यातील काही तरतुदी आणि प्रत्यक्ष कर कपातीबद्दलची परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली होती.

या प्रश्नावर कर मंडळाच्या अधिकाऱ्यांना उत्तर देण्याआधीच सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी हस्तक्षेप करुन सांगितले की, त्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की सीबीआयसी आणि सीबीडीटीचे अधिकारी त्याठिकाणी उपस्थित आहेत का? तुम्ही तुमच्या करधारकांच्या संपर्कात राहता का? अर्थ मंत्रालयाच्या सचिवांनी याठिकाणी बसून परिस्थिती स्पष्ट करावी असे हे प्रश्न नाहीत. हे काम कर मंडळांचे आहे. सीबीडीटी (CBDT) आणि सीबीआयसी (CBIC) ने शनिवारचा दिवस मोकळा ठेवावा आणि कर धारकांशी चर्चा करावी आणि सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर परिस्थिती स्पष्ट करावी.

त्यांनी (Nirmala Sitharaman) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमाशुल्क (CBIC) च्या अधिका-यांना कर कायद्यातील त्रुटी आणि धोरणांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करणार्‍यासंबंधी करधारकांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. जेणेकरुन वित्त विधेयकात आवश्यक कर सुधारणा तयार करण्यास मदत होईल. त्यांनी सांगितले की, अर्थसंकल्पावरील या चर्चा कार्यक्रमात विचारण्यात आलेले बहुतांश प्रश्न हे कर मंडळांशी संबंधित आहेत आणि दोन्ही मंडळे ते हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.

Finance Minister Nirmala Sitharaman on Monday Slams tax boards for ignoring taxpayers’ complaints. The Finance Minister directed the Central Board of Direct Taxes (CBDT) and the Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) to set aside Saturday for hearing of complaints by the tax authorities.

PL/KA/PL/08 MAR 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *