केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला इतका परतावा

 केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला इतका परतावा

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल ते 25 ऑक्टोबर या कालावधीत 77.92 लाख करदात्यांना (Taxpayers) 1,02,952 कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला आहे, असे आयकर विभागाने बुधवारी सांगितले. विभागाने सांगितले की या रकमेमध्ये 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी 46.09 लाख परताव्यांचा समावेश आहे, जे 6657.40 कोटी रुपयांचे आहेत.
आयकर विभागाने ट्विट केले – सीबीडीटी ने (CBDT) 1 एप्रिल ते 25 ऑक्टोबर या कालावधीत 77.92 लाखांहून अधिक करदात्यांना (Taxpayers) 1,02,952 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा जारी केला आहे. 76,21,956 प्रकरणांमध्ये 27,965 कोटी रुपयांचे प्राप्तिकर परतावे आणि 1,70,424 प्रकरणांमध्ये 74,987 कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर परतावे जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, सीबीडीटी ने   22 सप्टेंबरला 1 एप्रिल ते 20 सप्टेंबर दरम्यान 45.25 लाखाहून अधिक करदात्यांना (Taxpayers) 74,158 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा परतावा जारी केला होता.
The Central Board of Direct Taxes (CBDT) has issued refunds of over Rs 1,02,952 crore to 77.92 lakh taxpayers between April 1 and October 25, the Income-tax department said on Wednesday. The department said the amount includes returns of Rs 46.09 lakh for the assessment year 2021-22, amounting to Rs 6657.40 crore.
PL/KA/PL/28 OCT 2021

mmc

Related post