प्राप्तिकर विभागाने 11.73 लाख करदात्यांना परत केले 15,438 कोटी

 प्राप्तिकर विभागाने  11.73 लाख करदात्यांना परत केले 15,438 कोटी

नवी दिल्ली, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने ( Income-tax department ) बुधवारी सांगितले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात करदात्यांना 15,438 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा (Refund) देण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाच्या मते, यावर्षी एप्रिलमध्ये 11.73 लाख करदात्यांना परतावा देण्यात आला. मात्र ही परतावा रक्कम कोणत्या आर्थिक वर्षासाठी देण्यात आली हे अद्याप प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केलेले नाही. विभागाच्या म्हणण्यानुसार, यापैकी वैयक्तिक प्राप्तिकराअंतर्गत (Personal income tax) 11.51 लाख करदात्यांना 5,047 कोटी रुपये परत करण्यात आले. त्याचबरोबर कॉर्पोरेट (corporate) वर्गातील 21,487 करदात्यांना 10,392 कोटी रुपये परत करण्यात आले.
विभागाने ( Income-tax department ) ट्विटरवर म्हटले आहे की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 1 एप्रिल, 2021 ते 3 मे 2021 दरम्यान 11.73 लाख करदात्यांना 15,438 कोटी रुपये परत केले. त्याआधी सन 2020-21 या आर्थिक वर्षात विभागाने 2.38 कोटीहून अधिक करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपये परत केले होते. त्याच्या आधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच सन 2019-20 मध्ये प्राप्तिकर विभागाने परत केलेली रक्कम 1.83 लाख कोटी रुपये होती.
 

आपल्या प्राप्तिकर परताव्याची स्थिती तपासा
Check the status of your income tax refund

आपण प्राप्तिकर परताव्याची (income tax refund) स्थिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या संकेतस्थळावर किंवा प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर तपासू शकता. प्राप्तिकर परतावा (ITR refund) सर्वसाधारणपेण प्राप्तिकर भरल्यानंतर कामकाजाच्या 10 दिवसांच्या आत मिळतो. यासाठी ज्या करदात्यांनी प्राप्तिकर भरला आहे आणि आयकर परताव्याची प्रतीक्षा करत आहेत त्यांना प्राप्तिकर भरल्यानंतर दहा दिवसांनी आपल्या प्राप्तिकर परताव्याची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.
The Income-tax department on Wednesday said that more than Rs 15,438 crore was paid to taxpayers in the first month of the current financial year. According to the Income Tax Department, 11.73 lakh taxpayers were reimbursed in April this year. However, the Income Tax Department has not yet clarified for which financial year the refund was paid. Out of this, Rs 5,047 crore was refunded to 11.51 lakh taxpayers under personal income tax, according to the department. In addition, Rs 10,392 crore was refunded to 21,487 corporate taxpayers.
PL/KA/PL/6 MAY 2021

mmc

Related post