सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर नोटबंदी आणि जीएसटीचाही वाईट परिणाम

 सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर नोटबंदी आणि जीएसटीचाही वाईट परिणाम

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीचा (corona) बहुतांश क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबाबत (एमएसएमई) (MSME) बोलायचे झाले तर त्यावर केवळ कोरोना साथीचाच नाही तर नोटाबंदी आणि वस्तु आणि सेवा करांमधील (GST) गुंतागुंतीचाही परिणाम झाला आहे. मोदी सरकारच्या पीएमईजीपी (पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म उद्योगांची संख्या 2019-20 या आर्थिक वर्षात घटली आहे. वित्त वर्ष 2019 मध्ये 73427 पीएमईजीपी सुक्ष्म उद्योग सुरू करण्यात आले तर वित्त वर्ष 2019-20 मध्ये ते 9.2 टक्क्यांची घट झाली आणि केवळ 66,653 सुक्ष्म उद्योग सुरू होऊ शकले.
खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केव्हीआयसी) (KVIC) इंप्लीमेंटेड बेनेफिशियरी यूनिट्स द्वारे रोजगार निर्मितीतही घट झाली आहे. 2019 या आर्थिक वर्षात 5.87 लाख रोजगार निर्माण झाले होते, तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये 5.33 लाख. यापूर्वी 2019 या आर्थिक वर्षात 2018 च्या तुलनेत सुक्ष्म उद्योग आणि रोजगार निर्मितीचा दर जास्त होता. आर्थिक वर्ष 2018 मध्ये 48398 उद्योग सुरु केले गेले तर 3.87 लाख रोजगार निर्माण झाले होते.

कोरोना व्यतिरिक्त नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका
Denomination and GST hit in addition to Corona

केव्हीआयसीने नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पीएमईजीपी अंतर्गत 88 टक्के सूक्ष्म-लाभार्थ्यांवर कोरोना साथीचा (corona) नकारात्मक परिणाम झाला. या 88 टक्के पैकी 57 टक्के उद्योग कोरोना कालावधीत तात्पुरती बंद झाले तर 30 टक्के लोकांनी उत्पादन आणि महसुलात घट झाल्याचे सांगितले आहे. केव्हीआयसीच्या आकडेवारीनुसार पीएमईजीपी अंतर्गत 24 मार्च 2021 पर्यंत 60867 सूक्ष्म उद्योगांना मार्जिन मनी म्हणून 1834.2 कोटी रुपये देण्यात आले. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उद्योग समितीचे उपप्रमुख विश्वनाथ यांच्या मते, उद्योगांवर केवळ कोरोनाचाच परिणाम झालेला नाही तर त्यांच्यावर इतर गोष्टींचाही परिणाम झाला आहे. नोटबंदी, जीएसटी गुंतागुंत इत्यादीचा एमएसएमईवर नकारात्मक परिणाम झाला. विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाने (corona) 20-25 टक्के एमएसएमईवर परिणाम झाला ज्यांनी त्यांचे उत्पादन एक तर कमी केले किंवा त्यांचे कामकाज थांबवले परंतू जीएसटी समस्या आणि नोटाबंदीचा तीव्र परिणाम झाला.

पीएमईजीपी क्रेडिट लिंक्ड अनुदान कार्यक्रम
PMEGP Credit Linked Grants Program

पीएमईजीपी हा एक क्रेडिट-लिंक्ड अनुदान कार्यक्रम आहे. त्याचा उद्देश बिगर-शेती क्षेत्रात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करुन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. त्याअंतर्गत पारंपारिक कारागीर व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठवण्यात आले आहे. एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरानुसार या योजने अंतर्गत नवे उद्योग सुरु करण्यासाठी उत्पादन क्षेत्रातील लाभार्थी 25 लाख रुपयांपर्यंत्कर्ज मिळवू शकतील आणि सेवा क्षेत्रात 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यावर त्यांना विविध श्रेणींमध्ये 15 ते 35 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. ही योजना 2008 मध्ये सुरू करण्यात आली होती.
The corona epidemic has had a devastating effect on most areas. However, when it comes to micro, small and medium enterprises (MSMEs), it has been affected not only by the Corona outbreak but also by the complexities of demonitisation and Goods and Services Tax (GST). The number of micro-enterprises started under the Modi government’s PMEGP (Prime Minister’s Employment Generation Program) has declined in the financial year 2019-20.
PL/KA/PL/25 MAR 2021
 

mmc

Related post