मूडीज, फिचने रशियाचे रेटिंग ‘जंक’ श्रेणीत ठेवले
लंडन, दि.04 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीज (Moody’s) आणि फिच (Fitch) यांनी रशियाची (Russia) सरकारी विश्वासार्हता कमी करुन “जंक” श्रेणीत आणली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या कठोर निर्बंधानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने (Moody’s) रशियाचे (Russia) दीर्घकालीन आणि अधिक असुरक्षित (स्थानिक आणि परकीय चलन) रोखे मानांकन ‘बीएए3’ श्रेणीवरून ‘बी3’ श्रेणीत आणले, तर फिचने (Fitch) रशियाचे मानांकन ‘बीबीबी’ वरून ‘बी’ केले आहे आणि ते ‘रेटिंग वॉच निगेटीव्ह’ म्हणजेच वर्तमान पतमानांकन संदर्भात नकारात्मक दृष्टिकोनाच्या पातळीवर ठेवले आहे.
पतमानांकन कमी करुन ते ‘जंक’ श्रेणीत ठेवणे धोका दर्शवते. याचा अर्थ असा की आर्थिक बांधिलकी भलेही पूर्ण होत असली तरी देश कर्जाच्या उच्च जोखमीसंदर्भात नाजूक अवस्थेत आहे.
मूडीजने (Moody’s) एका निवेदनात म्हटले आहे की, रशियाचे (Russia) पतमानांकन खालच्या पातळीवर आणणे, ते आणखी कमी करण्यासंदर्भात लक्ष ठेवणे हा पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर निर्बंधांचा परिणाम आहे. या अंतर्गत रशियाची मध्यवर्ती बँक आणि इतर काही मोठ्या वित्तीय संस्थांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
फिच रेटिंग्सने (Fitch) म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या गांभीर्याने व्यापक-आर्थिक स्थैर्याचा धोका वाढला आहे. युद्धामुळे आर्थिक स्थैर्य धोक्यात आहे आणि ते रशियाची स्वत:ची सरकारी कर्जाची परतफेड करण्याची क्षमता कमी करु शकते.
गेल्या आठवड्यात, जी7 च्या प्रमुख अर्थव्यवस्थांनी रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर कठोर निर्बंध लादले. त्यांनी रशियन बँकांना स्विफ्ट (सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन्स) आंतर बँकींग प्रणालीमधून वगळण्याचाही निर्णय घेतला जेणेकरुन रशियाला जागतिक व्यवसायापासून वेगळे पाडता येईल.
Credit rating agencies Moody’s and Fitch have downgraded Russia’s government credibility to “junk”. The move comes after Western sanctions were imposed in the wake of Russia’s invasion of Ukraine.
PL/KA/PL/04 MAR 2022