कमी झाली बेरोजगारी: मार्चमध्ये बेरोजगारीचा दर घटला
नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड (Covid-19) संसर्गाच्या आथिर्क वर्ष 2020-21 ने जाता जाता रोजगाराच्या (Employment) आघाडीवर एक चांगली बातमी दिली आहे. गेल्या महिन्यात, देशात बेरोजगारीची (Unemployment) पातळी घसरून 6.52 टक्के झाली, म्हणजे 10,000 कामगारांपैकी 652 कामगार बेरोजगार होते. फेब्रुवारीमधील बेरोजगारीचा आकडा 6.90 टक्के होता. व्यवसाय आणि आर्थिक संशोधन संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) (CMIE) यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे.
शहरांमधील बेरोजगारीची पातळी 6.99 टक्क्यांवरून वाढून 7.24
Unemployment in cities rose to 7.24 per cent from 6.99 per cent
मार्चमध्ये बेरोजगारीचे (Unemployment) प्रमाण कमी होत असतानाही एक निराशाजनक बातमी देखील आहे. शहरांमधील बेरोजगारीची पातळी 7.24 होती, म्हणजे 10,000 कामगारांपैकी 724 बेरोजगार होते. फेब्रुवारीमध्ये हा आकडा 6.99 टक्के म्हणजेच 10,000 पैकी 699 बेरोजगार होते. वर्षाच्या पहिल्या महिन्यातही बेरोजगारी कमी झाली होती. जानेवारीत शहरांमध्ये बेरोजगारी 8.08 टक्के होती, जी डिसेंबरच्या 8.84 टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी होती.
ग्रामीण भागात बेरोजगारीची पातळी कमी होऊन 6.19 टक्के
Unemployment in rural areas fell to 6.19 per cent
सीएमआयईच्या मते, ग्रामीण भागातील बेरोजगारीची (Unemployment) पातळी मार्चमध्ये कमी होऊन 6.19 टक्के म्हणजेच 10,000 कामगारांमध्ये 619 इतकी होती. फेब्रुवारीमधील बेरोजगारीचा दर 6.86 टक्के (10,000 कामगारांपैकी 686) होता. 29 मार्चला सीएमआयईचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदीच्या परिणामांवर चर्चा केली होती. ते म्हणाले होते की अनेक लोकांचे म्हणणे आहे की टाळेबंदी हा समस्येवर तोडगा नाही.
मनमानी टाळेबंदीपेक्षा शारिरीक अंतरासह लसीकरण चांगले
Vaccination with physical distance is better than arbitrary lockdown
व्यास म्हणाले होते की विज्ञानाकडून आपल्याला विषाणू पासून बचाव करण्याची लस मिळाली आहे. मनमानी पद्धतीच्या टाळेबंदीऐवजी शारीरिक अंतराची शिस्त राखून प्रभावीपणे लसीकरण करणे चांगले असेल. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल ला कोविड संसर्गाची नवीन प्रकरणे 81,000 च्या पुढे गेली होती, जी एका दिवसातील सर्वात जास्त आहे. एकट्या महाराष्ट्रात 43,000 हून अधिक रुग्ण आढळले होते.
मागील वर्षी बेरोजगारीची पातळी एप्रिलमध्ये 23.52 टक्के आणि मे मध्ये 21.73 टक्के होती.
Last year, the unemployment rate was 23.52 per cent in April and 21.73 per cent in May
व्यास म्हणाले होते, टाळेबंदीमुळे बेरोजगारीचा (Unemployment) धोका वाढतो. गेल्या वर्षी, कोव्हिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा टाळेबंदी लावण्यात आली होती, तेव्हा एप्रिलमध्ये बेरोजगारीची पातळी 23.52 टक्के होती, म्हणजे 10,000 कामगारांमधील 2,352 बेरोजगार झाले होते. मे मध्ये परिस्थिती थोडी सुधारली होती, ज्यामुळे बेरोजगारीचा आकडा 21.73 टक्के झाला होता. त्यानुसार, त्या महिन्यात 10,000 कामगारांपैकी 2,173 कामगार बेरोजगार होते.
Covid-19 has given good news on the employment front as the financial year 2020-21 of the infection ends. Last month, the country’s unemployment rate fell to 6.52 per cent, leaving 652 out of 10,000 workers unemployed. The unemployment rate in February was 6.90 per cent. The figures were released by the Center for Monitoring Indian Economy (CMIE), a business and economic research organization.
PL/KA/PL/3 APR 2021