शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीने

 शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात तेजीने
मुंबई, दि. 02 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय भांडवली  बाजाराने  आठवड्याची सुरुवात तेजीने  केली.(Indian equities began the truncated week with gains) तेजीवाल्यांचे पारडे जड होते. या आठवड्यात फक्त तीन दिवसच कामकाज झाल्याने हा आठवडा मार्केटच्या कामकाजासाठी छोटा आठवडा होता . सोमवारी होळी (Holi) व शुक्रवारी गुड फ्रायडे (Good Friday) निमीत्त बाजार बंद होते. This week Financial and money Markets were closed on Monday and on Friday on account of Holi and Good Friday respectively.

मंगळवारी शेअर बाजारात चौफेर खरेदी. Bulls dominate D-Street

सलग  तीन दिवसांच्या  विश्रांतीनंतर  सुरु झालेल्या शेअर बाजारात गुंतववणूकादारांनी जोरदार खरेदी केली .यामुळे  मंगळवारी पहिल्याच सत्रात सेन्सेक्स १२०० अंकांनी उसळला आहे. निफ्टीने  जवळपास ४००अंकांची झेप घेतली. आशियाई बाजारातील मजबूत  संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीचा सपाटा लावला. फार्मा व आय.टी सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात तेजी. मंगळवारी युरोप आणि आशियातील शेअर्समध्ये वाढ झाली. तांत्रिक दृष्ट्या बाजार ओव्हरसोल्ड होता. (Tecnically Market Was Oversold.)

बुधवारी २०२१  आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मोठी नफावसुली सेन्सेक्स गडगडला.

Sensex cracks 627 points, market snapped a two-day winning streak
  बुधवारी सकाळी मार्केट सुरु होताच मार्केट मध्ये घसरण झाली  ५००अंकांनी मार्केट घसरले. विदेशी बाजारातून  नरमाईचे  संकेत मिळाल्याने मार्केट मध्ये घसरण झाली दुपारी मार्केट ६५० अंकांनी घसरले. २०२१ आर्थिक वर्षाच्याशेवटच्या दिवशी मोठी नफावसुली दिसून आली. हे आर्थिक वर्ष ११ वर्षातील परताव्याच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम वर्ष ठरले.परंतु शेवटच्या दिवशी जोरदार नफावसुली झाली. सलग दोन सत्रात १६०० अंकांची कमाई करणाऱ्या सेन्सेक्समध्ये मोठी नफावसुली झाली सेन्सेक्स बंद होताना ६११ अंकांनी घसरून  ४९,५०० च्या स्तरावरती बंद झाला. FMCG, PSU बँक , मेटल,रिअल इस्टेट  आणि फार्म समभागात चांगली खरेदारी झाली पण  प्रायव्हेट बँक वित्तीय  संस्था आणि आय.टी क्षेत्रातील समभागात दबाव होता.  करोना (Corona) रुग्णसंख्येत होणारी वाढ आणि लॉकडाउनची (Lockdown) टांगती तलवार यामुळे बाजारात सध्या नकारात्मक वातावरण आहे. कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी देशात ५६ हजार नवीन केसेस समोर आल्या एकट्या महाराष्ट्रात २८ हजाराच्या रुग्णसंख्या वाढली. पंजाब ,गुजरात,तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यात देखील परिस्थिती गंभीर आहे.
The Indian market snapped a two-day winning streak on March 31 and closed with losses of more than a percent. Weak global cues dented the rally on Dalal Street seen in the last two sessions. A rise in US bond yields triggered risk-off sentiment along with a rise in COVID-19 cases.

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली झाली बाजारात सकारात्मक वातावरण होते.

indices started the new financial year on positive note
गुरुवारी नवीन  आर्थिक वर्षाची सुरुवात चांगली झाली. परंतु वरच्या स्तरावरती थोडी नफावसुली झाली. परंतु दुपारनंतर मार्केटने उसळी घेतली सेन्सेक्स मध्ये ५८०  अंकांनी वाढ  झाली. जी.एस टी च्या ( GST) माध्यमातून येणाऱ्या करामधून विक्रमी नोंद झाली. मार्च महिन्यामध्ये  आतापर्यंतची  एका महिन्यातील  विक्रमी रक्कम  १.२४ लाख करोड रुपये एवढी  जमा झाली. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्यामुळे GST मधून अधिक कर जमा झाला या कारणाने मार्केटने उसळी भरली. (GST revenue collection hits new record ). BSE Sensex and Nifty 50 ended over one per cent higher

फार्मा व आय टी सेक्टर

(Pharma and I.T Sector)
 Infosys,TCS,Tech Mahindra,HCLTech या समभागात. येणाऱ्या काळात जेव्हा मार्केट मध्ये घसरण होईल त्यावेळी  दीर्घ काळाकरिता या समभागात गुंतवणूक करावी.

अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात कपातीचा निर्णय काही तासांत बदलला

No Change in Small Savings Scheme:
अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात कपातीचा रात्री घेतलेला निर्णय केंद्र सरकारने काही तासांत बदलला. व्याजदर कपात मागे घेत ते ‘जैसे थे’च ठेवल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी सकाळी ७.५४ मिनिटांनी ट्विट करून जाहीर केले The government on Thursday decided to withdraw the rate cut order on the small saving schemes. Finance Minister said interest rates on small savings schemes will continue to be at the levels as in March 2021

देशात उष्णतेची लाट.

मार्च महिन्यात तापमानाने  मागील सारे उच्चांक मोडले व नवीन विक्रम स्थापित केला. वातानुकूलिन  सेट्स ( Air Conditioner )च्या विक्रीत झपाट्याने वाढ़ झाली . वर्क फ्रॉम होम  ( Work From Home )या संकल्पनेमुळे ३ स्टार ऐवजी ५ स्टार वातानुकूलिन  सेट्स ची मागणी वाढली. त्यामुळे  Voltas, Blue Star या शेअर्स मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे
आय.टी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस चा चौथ्या तिमाहीचा निकाल १४ एप्रिल रोजी जाहीर करणार आहे. Indian IT bellwether Infosys is to announce its fourth-quarter FY21 results on April 14.
फायझर कंपनीने  जाहीर केले कि त्यांची लस हि १० ते १२ वयोगटातील मुलांकरिता १०० टक्के प्रभावी ठरत आहे. Pfizer-BioNTech says Covid vaccine is 100% effective in kids ages 12 to 15
गुंतवणूकदारांचे लक्ष हे  ,५ राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे आहे. पश्चिम बंगाल,तामिळनाडू,केरळ,आसाम व केंद्रशासित प्रदेश असलेल्या पॉण्डिचरी येथे निवडणूका  होत आहेत. निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे.
येणाऱ्या एक दोन महिन्यात मार्केट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उतरचढाव होण्याची शक्यता अधिक असल्याने गुंतवणूकदारांनी सावधानता  बाळगावी व शक्यतो दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी.येणाऱ्या काळात वैश्विक बाजारात घडणाऱ्या गोष्टीवरती भारतीय बाजाराचे लक्ष असेल व त्यानुसार तो आपली दिशा ठरवेल.Market would be volatile in near term.
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा    )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
ML/PGB
03 april 2021

mmc

Related post