फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”

 फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”

ठाणे, दि. २६ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली “प्रोजेक्ट महादेवा” ही योजना महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे – जिल्हास्तरावरील निवड चाचण्या, प्रादेशिक फेरी आणि अंतिम निवड फेरी. अंतिम टप्प्यात 60 मुलांची निवड सीआयडीसीओ ग्राऊंड, खारघर येथे आणि 60 मुलींची निवड डब्ल्यूआयएफए कूपरेज मैदान, मुंबई येथे केली जाईल. यापैकी प्रत्येकी 30 मुलगा‑मुलींची निवड केली जाईल आणि त्यांना पाच वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल, ज्यामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासाचाही समावेश असेल. निवड झालेल्या खेळाडूंना 14 डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळेल.

ही योजना MITRA, क्रीडा विभाग, WIFA, CIDCO आणि VSTF यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून, राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे. इच्छुक खेळाडूंनी निवड चाचण्यांपूर्वी दिलेल्या गूगल फॉर्मद्वारे नोंदणी 26 October पर्यंत करणे आवश्यक आहे.

यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी मुले व ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी मुली यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदान, सेक्टर १९, नेरूळ, नवी मुंबई येथील क्रीडांगणात सकाळी ८.०० वाजेपासून आयोजित करण्यात येणार आहे. या निवड चाचणी मध्ये सहभागी होण्याकरिता खेळाडूंनी आहे .https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA7
या गुगल लिंक द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

निवड चाचणी संदर्भात महत्वाच्या सूचना :-

१) सर्व खेळाडूंनी चाचणी स्थळी येण्यापूर्वी गुगल नोंदणी लिंकद्वारे (Google registration link) आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
२) या निवड चाचणी मध्ये १ जानेवारी २०१२ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले आणि ३१ डिसेंबर २०१३ रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले खेळाडू सहभागी होवू शकतील.
३) सर्व खेळाडूंनी त्यांचे मूळ आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
४) ठाणे जिल्हास्तर निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या २० खेळाडूंची निवड ही विभागस्तरीय निवड चाचणीसाठी करण्यात येईल.

हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असून, राज्यातील फुटबॉल खेळाला नवी दिशा देणारा आहे. तरी “महादेवा” या महत्त्वाकांक्षी योजनेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *