प्रसिद्ध गायक लकी अलीच्या एका वक्तव्याने आली त्याच्यावर ही वेळ

मुंबई , दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बॉलिवूडमधील कलाकार बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येतात. चालू घडामोडींवर आपले परखड मत मांडताना ते माध्यमांच्या सापळ्यात अडकतात. काही वेळा सहज सुटतात काही वेळा मात्र हे अवघड असते. अशाचप्रकारे चर्चेत आलेला कलाकार म्हणजे प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन मेहमूद यांचा मुलगा प्रसिद्ध गायक लकी अली. चाहता वर्ग तगडा असणारा तरुणांमध्ये तगडी क्रेझ असणारा असा हा गायक. बऱ्याच काळापासून लकी अली इंडस्ट्रीचा एक महत्वाचा गायक म्हणून ओळखला जातो. त्याने मोजकीच गाणी गायली असली तरी तो लोकप्रिय आहे.अनेकदा विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत लकी अली वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आत्ताच त्याने अलीकडेच फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती , ज्यामध्ये त्याने दावा केला होता की ‘ब्राह्मण’ हा शब्द ‘इब्राहिम’ वरून आला आहे. लकी अलीची ही पोस्ट काही काळातच व्हायरल झाली आणि त्याच्यावर चारही बाजूंनी जोरदार टीका होऊ लागली होती. वाढता विरोध पहाता त्यानंतर त्याने ती पोस्ट स्वतःच डिलीट केली आणि आता त्याने या प्रकरणावर माफीही मागितली आहे.लकी अलीने डिलिट केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “ब्राह्मण हे नाव ‘ब्रह्मा’ पासून आले आहे आणि ‘ब्रह्मा’ हे ‘अब्राम’’ वरून आले आहे…जे अब्राहम किंवा इब्राहिमपासून आले आहे.” ब्राह्मणांना इब्राहिमचे वंशज म्हणून वर्णन करताना त्यांने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ब्राह्मण हे इब्राहिम अलैहिस्सलाम यांचे वंशज आहेत… सर्व राष्ट्रांचे जनक… मग लोक एकमेकांशी तर्क न करता फक्त वाद आणि भांडण का करतात?लकी अलीची ही पोस्ट नेटकऱ्यांना मुळीच आवडली नाही. त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्याच्या पोस्टवरुन बराच वादही झाला. वाढता वाद लक्षात घेता त्याने त्यांची पोस्ट डिलिट केली आणि त्यानंतर माफीची पोस्टही शेअर केली.आपल्या नवीन पोस्टमध्ये लिहिलं की, त्यांचा उद्देश हा केवळ समाजातील विविध घटकांमधील लोकांना एकत्र करणे आहे. त्याला कोणामध्ये राग किंवा दुःख निर्माण करायचं नाही.लकी अलीने लिहिले की, मला माझ्या मागील पोस्टच्या वादाची जाणीव आहे. कोणालाही त्रास किंवा राग आणण्याचा माझा हेतू नव्हता आणि मला त्याबद्दल मनापासून खेद वाटत आहे. आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचा माझा हेतू होता पण हे योग्य नाही हे माझ्या लक्षात आले. मला जे म्हणायचे होते ते चुकीच्या पद्धतीने मांडले गेले. यापुढे मी जे पोस्ट करत आहे त्याबद्दल मी अधिक जागरूक राहील. माझ्या बोलण्याने माझ्या अनेक हिंदू बंधू भगिनींना त्रास झाला आहे. याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. मी तुमच्या सर्वावर खुप जास्त जास्त प्रेम करतो.
ML/KA/PGB 12 APR 2023