केजरीवालांची होणार NIA कडून चौकशी

 केजरीवालांची होणार NIA कडून चौकशी

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी गेल्या दीड महिन्यांपासून अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केजरीवाल यांच्यावर ED आणि CBI /यांच्या कारवायांनंतर आता NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडून चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या संदर्भात उपराज्यपालांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवले आहे. या पत्रात केजरीवाल यांच्यावर दहशतवादी संघटना Sikhs for Justice कडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केजरीवाल यांनी १६ मिलियन अमेरिकन डॉलर घेतल्याचा आरोप करत दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सस्केना यांनी NIAकडून चौकशी करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान आम आदमी पक्षाने हा एक कट असल्याचा आरोप केला आहे.
विश्व हिंदू महासंघाकडून उपराज्यपाल सक्सेना यांना एक तक्रार मिळाली होती. यामध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील’आप’ पक्षाने देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी आणि खलिस्तान समर्थकांना पाठिंबा देण्यासाठी कट्टरपंथियांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

उपराज्यपाल सक्सेना यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एनआयएकडून चौकशीची शिफारस केली आहे. तक्रार एका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केली आहे आणि बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेकडून निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आल्याने याप्रकरणी चौकशीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सस्केना यांनी ही शिफारस करताना जानेवारी २०१४ मध्ये केजरीवाल यांनी इकबाल सिंह यांना लिहलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे. या पत्रात आप सरकारने राष्ट्रपतींकडे भुल्लरच्या सुटकेची शिफारस केली होती.

SL/ML/SL
6 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *