इस्कॉन इंडियाच्या अध्यक्षांचे निधन

 इस्कॉन इंडियाच्या अध्यक्षांचे निधन

मथुरा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्कॉन इंडियाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी यांचे रविवारी देहरादून येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांना हृदयाशी संबंधित आजार होता. त्यांचे पार्थिव काल संध्याकाळी दिल्लीच्या पूर्वेकडील कैलास मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आज (6 मे ) वृंदावन येथील इस्कॉन गोशाळेत त्यांना समाधी देण्यात आली.2 मे रोजी गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराज एका मंदिराच्या पायाभरणी समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान ते घसरून पडले, त्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांना दुखापत झाली. त्यांना देहरादूनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गोपाल कृष्ण गोस्वामी यांनी भारत, कॅनडा, केनिया, पाकिस्तान, सोव्हिएत युनियन आणि जगाच्या अनेक भागांमध्ये पोहोचून समुदाय-निर्माणाचे कार्य केले. नवी दिल्लीतील ग्लोरी ऑफ इंडिया वैदिक सांस्कृतिक केंद्रासह जगभरात डझनभर मंदिरे आणि सांस्कृतिक केंद्रे बांधली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन झाले होते.जगातील सर्वात मोठे प्रकाशक असलेल्या भक्तीवेदांत बुक ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले. गोपाळ कृष्ण गोस्वामी यांनी अन्नमृता फाऊंडेशनही सुरू केले. जे आज देशातील 20,000 हून अधिक शाळांना अन्न पुरवठा करते. गोपाल कृष्ण गोस्वामी यांनी 70 हून अधिक देशांतील 50,000 हून अधिक लोकांना भक्ती योगाच्या प्रक्रियेत आणले.

गोपाल कृष्ण गोस्वामी यांचा जन्म १९४४ मध्ये दिल्लीत झाला. सोरबोन युनिव्हर्सिटी (फ्रान्स) आणि मॅकगिल युनिव्हर्सिटी (कॅनडा) येथे अभ्यास करण्यासाठी त्यांना दोन फेलोशिप देखील मिळाल्या. १९६८ मध्ये, ते इस्कॉनचे संस्थापक-आचार्य श्रीला प्रभुपाद यांना कॅनडामध्ये भेटले. यानंतर ते त्यांचे शिष्य झाले. सर्वांच्या शांती आणि कल्याणासाठी त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि सनातन धर्माची शिकवण जगभर पसरवण्यास सुरुवात केली.

6 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *