UN कडून २०२६ हे ‘जागतिक शेतकरी महिला वर्ष’ म्हणून घोषित

 UN कडून २०२६ हे ‘जागतिक शेतकरी महिला वर्ष’ म्हणून घोषित

न्यूयॉर्क, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतीचा शोध महिलांनी लावला असं म्हणतात. जागतिक कृषी उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांच्या श्रमांची मात्र फारशी दखल घेतली जात नाही. हे लक्षात घेऊन जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक शेतकरी महिला वर्षांच्या निमित्ताने शेतकरी महिलांचे प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील, असा विश्वास करत संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे जागतिक शेतकरी महिला वर्षे म्हणून जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत ही घोषणा करण्यात आली.

जगभरातील अन्न आणि शेती उत्पादनातील आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे. तसेच या आव्हानांना तोंड देण्यासाठी निश्चित उपाय शोधण्याचा आणि त्यानुसार शाश्वत विकासाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. २ मे २०२४ रोजी या ठरावाचं स्वागत करून संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेनेही प्रस्ताव स्वीकारला. अमेरिकेच्या कृषी विभागासोबतच अन्य १०० संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लैंगिक भेदभावाला आळा घालून अन्न सुरक्षा आणि गरीबी निर्मूलन करता येईल, असा या थीमचा उद्देश आहे.

शेती कामांमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. जगभरात अन्नसंकटाची चर्चा सुरू आहे. अन्नसुरक्षा बळकट करण्यासाठी शेतकरी महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं थीम निवडली आहे. शेती कामांमध्ये आणि अन्नधान्य उत्पादनांमध्ये महिलांचाही पुरुषांच्या बरोबरीनं सहभाग आहे. त्यामुळं शेतकरी महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे. अनेक देशांमध्ये अन्नधान्य उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत महिलांचा वाटा आहे. त्यामुळे शेतकरी महिलांचं अन्नसुरक्षेसाठी योगदान महत्त्वपूर्ण आहे.

SL/ML/SL

6 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *