महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार, महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमांमध्ये सुधारणा करणार

 महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार, महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियमांमध्ये सुधारणा करणार

मुंबई, दी २५: राज्यामध्ये नवीन कामगार संहिता लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ व महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नवीन कामगार संहितेमध्ये केंद्र शासनाचे विविध २९ कामगार कायदे एकत्र करुन चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. या संहितामध्ये कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि उद्योग सुलभता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यातील वेतन संहिता, २०१९ – किमान वेतन, वेतन देण्याची पद्धत. बोनस आणि समान वेतन यासंबंधी तरतुदी आहेत. औद्योगिक संबंध संहिता, २०२०:- कामगार संघटना, औद्योगिक वाद, सेवा अटी आणि नियोक्ता कामगार संबंध नियंत्रित करते. सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०:- पीएफ, ईएसआय, ग्रॅच्युइटी, मातृत्व लाभ आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांशी संबंधित आहे. तर व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामकाज परिस्थिती संहिता, २०२०:- कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य, कामाचे तास आणि कामगारांच्या कल्याणासाठी नियम निश्चित करते. या कामगार संहितांमध्ये महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ या राज्य विधानमंडळाद्वारे संमत केलेल्या अधिनियमांचा समावेश केलेला नाही.

या चार कामगार संहितामधील तरतुदी लागू केल्यानंतर केंद्रीय कायद्याचे स्वरुप बदलले आहे. अशा बदल झालेल्या कायद्यांबाबत, शब्दांचा राज्याच्या अधिनियमामध्ये जिथे आवश्यकता आहे, तिथे समावेश करावा लागणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ व महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *