UGC कडून देशातील ३२ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर

 UGC कडून देशातील ३२ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर

नवी दिल्ली,दि. 25 : देशाच्या बनावट शिक्षण संस्थांचा सुळसुळाट झाला असून यामुऴे हजारोंची फी भरुनही विद्यार्थी योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित राहत आहेत. भव्य इमारती,चमकदार वेबसाईट्स यामुळे या बोगस शिक्षण संस्थांच्या जाळ्यात विद्यार्थी फसत आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सावध करण्यासाठी UGC ने देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३२ बोगस विद्यापीठे; तसेच शैक्षणिक संस्थांची यादी आयोगाने जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश आहे.

नागपूर येथील ‘राजा अरेबिक युनिव्हर्सिटी’ आणि सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ‘नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ’ या दोन संस्थांचा ‘यूजीसी’च्या बोगस विद्यापीठांच्या यादीत समावेश आहे. या संस्थांना विद्यापीठ म्हणून पदवी प्रदान करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे; त्यामुळे अशा संस्थांकडून मिळणाऱ्या पदव्यांची शैक्षणिक आणि नोकरीच्या दृष्टीने वैधता ग्राह्य धरली जाणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ‘UGC’ ने बोगस विद्यापीठांची नावे प्रसिद्ध केली आहे. प्रवेश घेण्यापूर्वीच नव्हे, तर कोणताही शैक्षणिक किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित संस्थेची सत्यता तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना केवळ विद्यापीठाचे नाव, आकर्षक जाहिरात किंवा मोठ्या दाव्यांना भुलू नका. संबंधित विद्यापीठाला पदवी प्रदान करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, अभ्यासक्रमाला मान्यता आहे का आणि शिक्षण देण्याच्या पद्धतीला परवानगी आहे का, याची खात्री करूनच प्रवेश घ्या,’ असा स्पष्ट इशारा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थी आणि पालकांना दिला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *