सत्तर वर्षांची परंपरा मोडत विवाहित महिला झाली Miss Universe

 सत्तर वर्षांची परंपरा मोडत विवाहित महिला झाली Miss Universe

विवाहित आणि एका मुलाची आई असलेल्या, पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो यांना यावर्षी मिस युनिव्हर्स 2026 चा मुकुट जिंकला आहे. 27 वर्षीय जेनिफर बॅरेटोने यापूर्वी कधीही रॅम्पवर पाऊल ठेवले नव्हते, ती 75 वी मिस युनिव्हर्स झाली आहे. आपल्या मुली आणि पतीसोबत राहणाऱ्या आणि अमेरिकन सैन्यात कार्यरत असलेल्या जेनिफरने हा किताब जिंकून इतिहास रचला आहे काल सॅन जुआन येथे पार पडलेल्या 75 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने विजय मिळवून इतिहास घडवला. हा किताब जिंकणारी ती पहिली विवाहित महिला आणि पहिली माता ठरली आहे. तिच्या या विजयामुळे नियमांमधील त्या बदलांकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे, ज्यांनी जवळपास सात दशके चाललेली एक परंपरा संपुष्टात आणली

मिस युनिव्हर्स २०२६ या स्पर्धेत ११६ देशांतील मॉडेल्सनी भाग घेतला होता आणि जेनिफरने त्या सर्वांना हरवून आपला विजय निश्चित केला.जेनिफरने अंतिम फेरीतील प्रश्नाचे अत्यंत हुशारीने उत्तर देऊन परीक्षकांना प्रभावित केले. पोर्तो रिकोच्या मायागुएझची रहिवासी असलेली जेनिफर बॅरेटो अवघ्या २७ वर्षांची आहे. मॉडेलिंगसोबतच तिने मानसशास्त्राचा अभ्यास केला असून समाजकार्यही केले आहे. या स्पर्धेत ११६ देशांतील मॉडेल्सच्या विचारशक्ती, आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची चाचणी घेण्यात आली. जेनिफर बॅरेटोने सर्व फेऱ्या पार करून आपल्या देशाला गौरव मिळवून दिला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *