आयकर विभागाने तक्रारी दाखल करण्यासाठी जारी केले तीन ईमेल आयडी

 आयकर विभागाने तक्रारी दाखल करण्यासाठी जारी केले तीन ईमेल आयडी

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आयकर विभागाने (IT) फेसलेस असेसमेंट योजनेअंतर्गत (Faceless Assessment Scheme) करदात्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी तीन अधिकृत ईमेल आयडी जारी केले आहेत. या योजनेअंतर्गत करदात्यांना आयकर विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.
 

करदात्यांची सेवा आणखी सुधारण्यासाठी
To further improve the service of taxpayers

आयकर विभागाने (IT) समुह माध्यमाद्वारे सांगितले की, करदात्यांची सेवा आणखी सुधारण्यासाठी विभागाने प्रलंबित प्रकरणांबाबत तक्रारी नोंदवण्यासाठी फेसलेस योजनेअंतर्गत (Faceless Assessment Scheme) ई-मेल आयडी तयार केले आहेत. विभागाने पुढे सांगितले की याद्वारे करदाते तीन वेगवेगळ्या ईमेल आयडीद्वारे तक्रारी करू शकतात.

यात करदाते आणि कर अधिकारी समोरासमोर येत नाहीत
Taxpayers and tax officials do not come face to face

फेसलेस असेसमेंट योजनेअंतर्गत (Faceless Assessment Scheme), म्हणजेच ई-असेसमेंट अंतर्गत, करदाते आणि कर अधिकारी हे समोरासमोर येत नाहीत. त्यामुळे करदात्यांना कोणतीही तक्रार दाखल करणे सोपे होईल. त्याचबरोबर त्यांची समस्या देखील सहजपणे सोडविली जाईल. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती.
 

हे आहेत तीन ईमेल आयडी
These are the three email ids

फेसलेस असेसमेंट योजनेसाठी तुम्ही Samadhan.faceless.assessment@incometax.gov.in चा वापर करू शकता.
फेसलेस दंडासाठी, samadhan.faceless.penalty@incometax.gov.in चा वापर करू शकता.
फेसलेस अपीलसाठी तुम्ही samadhan.faceless.appeal@incometax.gov.in वर मेल करू शकता.
 
The Income Tax Department has issued three official email IDs to the taxpayers for filing complaints under the Faceless Assessment Scheme. Under this scheme, taxpayers are not required to meet any official of the Income Tax Department. The Income-tax department said social group media that in order to further improve the service of taxpayers, the department has created e-mail IDs under the faceless scheme for registering complaints about pending cases.
PL/KA/PL/9 AUG 2021

mmc

Related post