पीएफआय संबंधित एकाची चौकशी आणि घराची झडती

 पीएफआय संबंधित एकाची चौकशी आणि घराची झडती

नाशिक, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशभरात आज पी एफ आय विरूध्द मोहीम छेडण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये पी एफ आयशी संबंधित मोमीनपुरा भागात राहणाऱ्या गुफरान खान याची पोलिसांनी चौकशी केली त्याच्या घराची चार-तास झडती घेतली तसेच पाच तास त्याची मालेगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी करण्यात आली.

त्याला एक नोटीस देण्यात आली असून या नोटीसीमध्ये त्यांनी उद्या मुंबईला NIAच्या कार्यालयामध्ये त्याच्या भावासह हजर राहण्याबाबत त्याला सांगण्यात आला आहे असे समजते. पीएफआय चे मालेगाव मध्ये सेंटर आहे आणि यापूर्वी दोन जणांना येथे ताब्यात घेतलेले आहे, ते दोघेही अद्याप जेलमध्ये आहेत.

पी एफ आय चे मालेगाव हे एक सेंटर आहे आणि गुफरान याचे केरळमध्ये पी एफ आय सी संबंध असल्याचा देखील समोर आलेले आहे. पी एफ आय चे मुख्य सेंटर केरळमध्ये असल्याचा संशय आहे आणि यापूर्वी गुफरान ची एटीएसने देखील चौकशी केलेली आहे.Investigation and house search of a PFI related person

ML/KA/PGB
13 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *