कोरोनाच्या सावटामधून अर्थव्यवस्था बाहेर पडणार
मुंबई, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7.6 टक्के दराने वाढेल. इंडिया रेटिंग अँड रिसर्चने (India Ratings) हा अंदाज व्यक्त केला आहे. संस्थेने सांगितले की जवळजवळ दोन वर्षांच्या अंतरानंतर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) अर्थपूर्ण विस्तार होईल. 2022-23 मध्ये वास्तविक जीडीपी 2019-20 (कोविडपूर्व पातळी) पेक्षा 9.1 टक्के जास्त रहाणार असल्याचा अंदाज आहे.
इंडिया रेटिंग (India Ratings) अहवालात सांगण्यात आले आहे की पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian economy) आकार जीडीपीच्या (GDP) ट्रेंड व्हॅल्यूपेक्षा 10.2 टक्के कमी असेल. या तुटीसाठी खासगी उपभोग आणि गुंतवणुकीची मागणी कमी होणे हे मुख्य कारण असेल. या घसरणीमध्ये खासगी उपभोगाचा वाटा 43.4 टक्के असेल आणि गुंतवणुकीच्या मागणीचा वाटा 21 टक्के असेल. त्याआधी याच महिन्यात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जीडीपीवर आपल्या पहिल्या आगाऊ अंदाजात सांगितले होते की 2021-22 मध्ये आर्थिक विकास दर 9.2 टक्के असेल. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी घसरली होती.
इंडिया रेटिंग्सचे (India Ratings) मुख्य अर्थतद्न्य आणि संचालक सुनील कुमार सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकार आणि रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेच्या वाढीला मदत करतील. ते म्हणाले की, सरकारला वित्तीय मजबूतीकरणाची घाई नाही. याचा अर्थ असा आहे की 2022-23 मध्येही वित्तीय तूट जास्त राहील. यात वाढीला समर्थन मिळेल.
संस्थेचा अंदाज आहे की 2022-23 मध्ये वित्तीय तूट 5.8 ते सहा टक्क्यांच्या दरम्यान असेल. सिन्हा यांनी सांगितले की, सध्या महागाईचा कल वरच्या दिशेने आहे आणि अर्थव्यवस्थेची (Indian economy) सुधारणा मंदावली आहे. अशा स्थितीत नजीकच्या भविष्यात रिझर्व्ह बँक धोरणात्मक दर वाढवण्याचे टाळेल.
The Indian economy will grow at a rate of 7.6 per cent in the next financial year 2022-23. India Ratings has made this estimate. The agency said that after a gap of almost two years, there would be a significant expansion in the country’s gross national product (GDP).
PL/KA/PL/21 JAN 2022