नोमुराने भारताच्या विकास दराच्या अंदाजात केली कपात

 नोमुराने भारताच्या विकास दराच्या अंदाजात केली कपात

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जपानची ब्रोकरेज कंपनी नोमुरा (Nomura) ने कोरोना साथीच्या (corona pandemic) दुसर्‍या लाटेमुळे भारताच्या विकास दराच्या (Growth Rate) अंदाजात मोठी कपात केली आहे. कंपनीने 2021-22 दरम्यान भारताच्या जीडीपी वाढीचा (GDP Growth) अंदाज 10.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. याआधी नोमुराने चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 12.6 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. कंपनीने असेही म्हटले आहे की कोव्हिड-19 च्या (Covid-19) दुसर्‍या लाटेमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीचा (Lockdown) भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीवर (economic recovery) खूप वाईट परिणाम होत आहे. नोमुराच्या मते, सध्या देशातील आर्थिक घडामोडी कमी होऊन जून 2020 मधील पातळीवर आल्या आहेत.
जपानी ब्रोकरेज कंपनीच्या आकलनानुसार, 9 मे रोजी संपलेल्या आठवड्यात आर्थिक घडामोडी साथीच्या आधीच्या पातळीच्या तुलनेत अवघ्या 64.5 टक्क्यांवर आल्या आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की केवळ एका आठवड्यातच आर्थिक घडामोडींमध्ये पाच टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.

मंद होत असलेल्या आर्थिक घडामोडींचा परिणाम
The result of slowing economic developments

नोमुराचे म्हणणे आहे की त्यांनी भारताच्या जीडीपीच्या वाढीच्या (GDP Growth) अंदाजात केलेली कपात ही टाळेबंदीमुळे (Lockdown) मंद होत असलेल्या आर्थिक घडामोडींचा (economic developments) परिणाम आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्याचा परिणाम एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत आर्थिक विकास दराच्या (economic growth rate) मंदावत असलेल्या रूपातही दिसून येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते लसीकरण, जागतिक पुनर्प्राप्ती आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा यासारख्या सकारात्मक गोष्टी असूनही स्थानिक परिस्थितीचा वाईट परिणाम एप्रिल ते जून या तिमाहीत दिसून येईल.

हालचालींवरील निर्बंध प्रमुख कारण
Restrictions on movement are the main reason

हालचालींवरील निर्बंध हे आर्थिक घडामोडी (economic developments) कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचेही नोमुरा (Nomura) यांनी निदर्शनास आणून दिले आहे. कंपनीच्या मते, 9 मे रोजी संपलेल्या आठवड्यात कामगार सहभागाचे प्रमाण वाढून 41.3 टक्के झाले जे मागील आठवड्यात 38.9 टक्केच होते. परंतु आठवड्याच्या आधारे वीजेच्या मागणीत 4.1 टक्क्यांनी घट झाली आहे, जी आर्थिक घडामोडी मंदावल्या असल्याची साक्ष देत आहे.

कठोर प्रतिबंधांचे वाईट परिणाम
Bad consequences of strict restrictions

भारतातील कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेदरम्यान, गेले अनेक दिवस दररोज 4 लाख नवीन रुग्ण आढळत आहेत. मृत्यूची आकडेवारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत देशातील 20 हून अधिक राज्यात टाळेबंदी (Lockdown) किंवा टाळेबंदीसारखे कठोर प्रतिबंध लागू आहेत. साथ रोखण्याच्या या प्रयत्नांमुळे गेल्या वर्षीच्या मंदीतून सावरण्याच्या प्रयत्नांवर वाईट परिणाम होत आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान भारताच्या जीडीपीत (GDP) 7.6 टक्क्यांची घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात 10.5 टक्क्यांचा विकास दर (Growth rate) गाठण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेने (RBI) व्यक्त केली आहे, ज्याचा मुख्य आधार आहे गेल्या वर्षीच्या नकारात्मक विकास दराचा आधार परिणाम. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे हे लक्ष्य साध्य होण्याच्या अपेक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही तज्ञांचे मत आहे की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वोच्च स्तर जूनमध्ये आला तर वित्तीय वर्ष 2021-22 चा जीडीपी विकास दर 8.2 टक्क्यांपेक्षा जास्त राहू शकणार नाही. मागील आर्थिक वर्षाचा नकारात्मक आधार परिणाम लक्षात घेतला तर हा विकास दर नगण्य आहे.
 
Japanese brokerage firm Nomura has slashed India’s growth rate estimates due to the second wave of corona pandemic. The company has downgraded India’s GDP growth forecast to 10.8 per cent during 2021-22. Earlier, Nomura had projected the Indian economy to grow at 12.6 per cent in the current fiscal.
PL/KA/PL/12 MAY 2021
 

mmc

Related post