भारतात किरकोळ महागाई मर्यादेपेक्षा जास्त : मूडीज अनॅलिटिक्स
नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील महागाईची पातळी (inflation level) मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मत मूडीज अनॅलिटिक्सने (Moodys Analytics) व्यक्त केले आहे. मूडीजच्या मते, आशियातील इतर देशांपेक्षा भारतातील महागाईची पातळी ही अपवादात्मक स्वरुपात खुपच जास्त आहे. मूडीज अॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, महाग तेलामुळे किरकोळ महागाई वाढू शकते आणि यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेवर पुढेही दरात कपात करण्यासंदर्भातला दबाव राहू शकतो.
जानेवारी 2021 मध्ये किरकोळ महागाईचा दर (inflation rate) 4.1 टक्के होता, तो फेब्रुवारीमध्ये वाढून 5 टक्क्यांवर गेला. आर्थिक धोरणांबाबत निर्णय घेताना रिझर्व्ह बँक किरकोळ महागाईदेखील विचारात घेते. कोअर महागाई (अन्न, इंधन आणि प्रकाश वगळता) फेब्रुवारीमध्ये 5.6 टक्के होती तर जानेवारीत ती 5.3 टक्के होती. मूडीज अनॅलिटिक्सच्या मते आशिया खंडात केवळ भारत आणि फिलीपिन्समध्ये महागाई सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे.
दोन आशियाई देशांमध्ये महागाई सामान्य पातळी पेक्षा जास्त
Inflation is higher than comfort level in two Asian countries
मूडीज अनॅलिटिक्सचे (Moodys Analytics) म्हणणे आहे की आशिया खंडातील बहुतेक देशांमध्ये महागाई जवळजवळ नियंत्रणाखाली आहे आणि यावर्षी 2021 मध्ये महाग तेल आणि सामान्य होत असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे त्यात हळूहळू वाढ होईल. मूडीज अनॅलिटिक्सच्या मते आशियामध्ये केवळ भारत आणि फिलिपिन्स हे दोन असे देश आहेत ज्याठिकाणी महागाई (inflation level) सामान्य पातळीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे धोरण तयार करणार्यांसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. यावर्षी कच्चे तेल 26 टक्क्यांनी महाग झाले आहे आणि त्याचे दर प्रति बॅरल 64 अमेरिकन डॉलर इतके आहेत. गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये कच्चे तेल 30 च्या आसपास होते, तर कोरोना संकट आपल्या सर्वोच्च पातळीवर होते.
महागाईमुळे धोरणे निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेपुढे आव्हान
Inflation poses challenge to RBI
मूडीच्या अनॅलिटिक्सच्या (Moodys Analytics) मते, भारतात महागाई (inflation level) ही खुपच चिंतेची बाब आहे. अन्नधान्याच्या अस्थिर किंमती आणि महागड्या तेलामुळे गेल्या वर्षी 2020 मध्ये किरकोळ महागाई दर मागील वर्ष अनेक वेळा 6 टक्क्यांच्या वर गेला आहे. त्यामुळे कोरोना साथीच्या वेळी आर्थिक धोरण ठरविण्यामध्ये रिझर्व्ह बँकेला बर्याच आव्हानांचा सामना करावा लागला. चलनविषयक धोरण चौकटी अंतर्गत रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई 4 टक्के (दोन टक्क्यांनी कमी किंवा जास्त) ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
According to Moody’s Analytics, India’s inflation level is above the limit. According to Moody’s, India’s inflation rate is exceptionally high compared to other Asian countries. According to Moody’s Analytics, rising oil prices could push up retail inflation and put further pressure on the Reserve Bank of India to cut rates.
PL/KA/PL/31 MAR 2021