जीडीपी विकास दर 10.2 टक्के राहण्याची शक्यता; केअर रेटिंग्स

 जीडीपी विकास दर 10.2 टक्के राहण्याची शक्यता; केअर रेटिंग्स

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केअर रेटिंग्जने आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) (GDP) विकास दर कमी करुन 10.2 टक्के केला आहे. याआधी विकास दर 10.7 ते 10.9 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना विषाणूच्या (coronavirus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने विविध राज्यांमध्ये निर्बंध लादले जात आहेत, आर्थिक घडामोडींवर परिणाम होत आहे आणि विकास दराचा अंदाज कमी करण्यात आला आहे.
मागील एका महिन्यात पतमानांकन संस्थेने अंदाजात सुधारणा करण्याची ही तिसरी वेळ आहे. केअर रेटिंग्जने एका अहवालात म्हटले आहे की त्यांनी 2021-22 मधील जीडीपी (GDP) वाढीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की गेल्या 30 दिवसात झालेल्या बदलांमुळे अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांनी तो आता कमी करुन 10.2 टक्क्यांवर आणला आहे.

आधी 11 ते 11.2 टक्के रहाण्याचा अंदाज होता
It was earlier projected at 11 to 11.2 per cent

केअर रेटिंग्जने याआधी 24 मार्च 2021 रोजी जीडीपी (GDP) विकास दर 11 ते 11.2 टक्के राहील असा अंदाज वर्तविला होता. महाराष्ट्रात कोविड (Covid-19) संसर्गाचा झपाट्याने प्रसार झाल्यानंतर राज्य सरकारने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सौम्य टाळेबंदी जाहीर केली होती. राज्यातील निर्बंधांमुळे आर्थिक घडामोडींवर परिणाम झाल्याने 5 एप्रिलला संस्थेने 2020-21 मधील जीडीपीचा अंदाज 10.7 वरून 10.9 टक्क्यांपर्यंत खाली आणला होता.
केअर रेटिंगनुसार, परंतू त्यानंतर 20 एप्रिल पासून टाळेबंदी (Lockdown) अधिक कडक करण्यात आली त्यामुळे आगामी काळात व्यवसायातील घडामोडींवर आणखी प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कोरोना (coronavirus) संसर्गाचे वाढते रुग्ण लक्षात घेता इतर अनेक राज्यांनीही निर्बंध लादले आहेत. यात शनिवार व रविवार टाळेबंदी, संपूर्ण टाळेबंदी आणि रात्रीच्या संचारबंदीचा समावेश आहे.
 
CARE Ratings has downgraded India’s GDP growth rate to 10.2 per cent for the financial year 2021-22. Earlier, the growth rate was projected at 10.7 to 10.9 per cent. Due to the rapid increase in the number of coronavirus patients, restrictions are being imposed in various states, economic developments are being affected and growth rate estimates are being reduced.
PL/KA/PL/22 APR 2021
 

mmc

Related post