भारताचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अशक्य

 भारताचे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अशक्य

मुंबई, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे (Indian economy) सुमारे 83 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेने 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (5 trillion economy) होण्याचे लक्ष्य कठीण वाटत आहे.

कोरोनाच्या आधीपासूनच घसरण
decline before corona

वास्तविक कोरोनाच्या (corona) आधीपासूनच जीडीपीमध्ये (GDP) घसरण होत आहे. कोरोना हे एक निमित्त आहे. त्यापूर्वी, आपण आथिर्क वर्ष 2018 पासून पाहिले तर अर्थव्यवस्थेत (Indian economy) सतत घसरण सुरु आहे. यामागचे कारण असे आहे की बचत आणि गुंतवणूकीवरील व्याज दर कमी होत राहिले. काही अर्थशास्त्रज्ञांचे असे मत आहे की 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांची नोटाबंदी आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्याने अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला.

आव्हाने लवकरच संपणार नाहीत
The challenges will not end soon

अर्थव्यवस्थेपुढे (Indian economy) आणखी आव्हाने दिसत आहेत. कारण कोरोनाचा (corona) परिणाम इतक्या लवकर संपणार नाही. त्याचा वाईट परिणाम बेरोजगारीपासून ते व्यवसाय तसेच प्रत्येकाच्या बचतीवर आणि खर्चावर झाला आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी, लोकांना रोजगार मिळण्यासाठी आणि गुंतवणूक तसेच बचत होण्यासाठी बराच काळ लागेल.

दुसर्‍या सहामाहीत दिसणार प्रगती
Progress will be seen in the second half

अर्थशास्त्रज्ञांचे असे मत आहे की चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजेच एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीतल्या दुसरे सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च या काळात जीडीपीमध्ये (GDP) चांगली प्रगती दिसेल. वास्तविक 2020 च्या एप्रिल ते 2021 च्या मार्च दरम्यान हाच कल होता. त्यावेळी पहिल्या दोन तिमाहीत जीडीपीमध्ये घट झाली आणि त्यानंतरच्या दोन तिमाहीत त्यात प्रगती झाली होती.
वास्तविक, कोरोनाच्या (corona) काळात जीडीपीचे 83 अब्ज डॉलरचे म्हणजेच 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, जर आपण डॉलरच्या तुलनेत सध्या सुरु असलेला 73 रुपयांचा दर धरला तर त्यानुसार, आपल्या जीडीपीचा आकार 2.7 लाख कोटी डॉलर आहे.

3 वर्षात दरवर्षी 25 टक्के वाढीची आवश्यकता
Requires 25 percent growth every year for 3 years

त्यानुसार, येत्या तीन वर्षांत भारताला वार्षिक 25 टक्के जीडीपी (GDP) वाढ करावी लागेल. आपण सध्या कोरोनाच्या ज्या टप्प्यातून जात आहोत आणि ज्याप्रकारे तिसर्‍या आणि चौथ्या लाटेबाबत सांगण्यात येत आहे अशा परिस्थितीत ते आणखीनच कठीण आहे. विश्लेषकांचे मत आहे की यावर्षी कोरोना (corona) संपेल आणि सर्व काही रुळावर येईल असे जरी गृहित धरले तरीदेखील 25 टक्क्यांची वाढ केवळ अशक्य आहे.

चालू वर्षातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज 9 टक्क्यांच्या आसपास आहे
The economy is projected to grow at around 9 percent this year

आता या चालू वर्षात जीडीपी (GDP) वाढीचा अंदाज असा आहे. एडेलवाइसने 9 ते 9.5 टक्के वाढ अपेक्षित केली आहे, तर मूडीजने 9.3 टक्के, आयसीआयसीआय सिक्युरिटीज 9.6 टक्के, येस बँक 8.5 टक्के, एसबीआय रिसर्च 7.9 टक्के, एचएसबीसी 8 टक्के आणि कोटक इकॉनॉमिक रिसर्चने 9 टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे. आता या वर्षी जर अशी वाढ झाली तरी उर्वरित वर्षांत वाढीचा दर 25 टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवा. अशा परिस्थितीत भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था (5 trillion economy) निश्चित केलेल्या वेळेत गाठणे फारच अवघड आहे.
The Indian economy has lost about 83 billion dollers in the 2020-21 financial year. The country’s gross domestic product (GDP) has declined by 7.3 per cent during the period. In such a scenario, the Indian economy is facing a difficult target of 5 trillion economy by 2025.
 
PL/KA/PL/03 JUNE 2021
 

mmc

Related post