दुष्काळग्रस्त भागात पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांमध्ये उत्साह

 दुष्काळग्रस्त भागात पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांमध्ये उत्साह

बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात अंबाजोगाई सह जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामुळे मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल सायंकाळपासून विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शेतात पाणी थळथळले आहे.

बीड, आष्टी, पाटोदा वगळता इतर सर्व भागात १२ तासापेक्षा अधिक काळ पाऊस पडला आहे. यामुळे माजलगाव येथील लेंडी नदीला पूर आला आहे. याशिवाय परळी ,गेवराई आणि अंबाजोगाई भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

ML/ML/SL

11 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *