पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स

 पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतू. पण या ऋतूत काही आजारही येतात त्यामुळे स्वतःची आणि घराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स:

  • उकळलेले पाणी प्या- दुषित पाणी प्यायल्यामुळे उलट्या, जुलाब, टायफॉइड आणि कावीळ यांसारखे अनेक साथीचे आजार होऊ शकतात, त्यामुळे पाणी उकळून प्यावे.
  • रस्त्यावरचे अन्न खाऊ नका- पावसाळ्यात बाहेरचे, उघडे अन्न खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यावरचे अन्न खाणे टाळावे आणि घरच्या पौष्टीक अन्न खाण्यावर भर द्यावा. त्यामुळे तुमचे पोटही चांगले राहिल शिवाय पचनही चांगले होईल.
  • डासांपासून सुरक्षा- पावसाळ्यात पाणी साचून राहिल्याने डास तयार होतात. परिणामी साथीचे आजार होतात. त्यामुळे घरी किंवा घराबाहेर पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. घरासभोवतालचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवा – पावसाळ्यात ताजे-सकस अन्न खाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. यासाठी आहारात फळे, भाज्या यांचा समावेश करावा. गरम सूप प्यावे. शिळे अन्न खाणे टाळावे. पालेभाज्या नीट धुवून घ्याव्यात. पोट बिघडत असेल तर हलके अन्न खावे. सुदृढ राहण्याला प्राधान्य द्यावे,
  • त्वचेची काळजी – पावसाळ्यात त्वचेसंबंधीत बऱ्याच समस्या निर्माण होतात. पावसाच्या पाण्यामुळे रॅश येऊ शकते अशावेळी भिजून आल्यावर चेहरा स्वच्छ धुवणे गरजेचे आहे. स्कीन एलर्जी टाळण्यासाठी ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका.
  • केसांची काळजी – पावसात भिजल्याने केस ओले राहू शकतात, तसेच केस खराबही होतात. त्यामुळे जर भिजून केस ओले झाले तर लगेच कोरडे करा.

Here are some tips to take care of your health during monsoons

TR/ML/PGB
11 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *