शेअरबाजाराकडून गुंतवणूकदारांना चांगली अपेक्षा

 शेअरबाजाराकडून गुंतवणूकदारांना चांगली अपेक्षा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवे संवत्सर सुरु होऊन २ आठवडे झाले. व या वर्षी देखील बाजार छान returns देतील अशी गुंतवणूकदारांची आशा आहे. मागील वर्षी सेन्सेक्सने व निफ्टीने जबरदस्त परतावा दिला होता त्याचीच पुनरावृत्ती होईल का असा प्रश्न गुंतवणूकदारांपुढे आहे. जागतिक बाजार सध्या वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहे. अमेरिकेतील Federal Reserve अपेक्षेपेक्षा लवकर Bond buying program बंद करेल व त्यामुळे व्याज दर वाढतील याचा फटका जागतिक बाजाराला बसेल अशी भीती गुंतवणूकदारांना आहे त्यामुळे जागतिक बाजारात सध्या नरमाईचे वातावरण आहे. अमेरिका,जर्मनी येथे कोरोनाचे रुग्ण पुन्हा डोके वर काढत आहेत. तेथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे या मुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा खीळ बसेल अशी भीती गुंतवणूकदारांना आहे. याचा फटका जागतिक बाजाराला बसला आहे. भारतीय बाजारात देखील गेल्या आठवड्यात प्रचंड घसरण झाली. अर्थव्यवस्थेपुढे अजून बरीच आव्हाने असल्यामुळे या वर्षी बाजार गेल्यावर्षीप्रमाणेच परतावा देईल अशी आशा ठेवण्यापेक्षा घसरणीच्या फायदा उचलावा व दीर्घकाळाकरिता चांगल्या कंपन्यांचे शेअर्स investment करीता घ्यावे.

प्रचंड चढ उतारामुळे बाजाराने दिला सपाट बंद. Sensex, Nifty end flat amid volatility.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड चढ उतार होते. बाजाराची सुरुवात चांगली झाली परंतु मेटल आणि PSU बँकांतील विक्रीने बाजारावर दबाव आणला. घाउक किमतीवर आधारित असलेल्या महागाई दरात ऑक्टोबर मध्ये वाढ (चलन वाढ १२.%) क्रूड ऑइल मध्ये झालेल्या वाढीमुळे महागाई दरात वाढ झाली. ह्याचा परिणाम बाजारावर झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३२ अंकांनी वधारून ६०,७१८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६.७० अंकांनी वधारून १८,१०९चा बंद दिला.

सेन्सेक्स ३९६ अंकांनी घसरून बंद झाला. Sensex falls 396 points

मंगळवारी बाजार पुन्हा प्रचंड चढ उतारामुळे घसरला बँकिंग,मेटल,फार्मा,ऑइल अँड गॅस क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर चांगलाच दबाव आला. मार्केट बंद होण्यापूर्वी सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला. आय.टी आणि ऑटो क्षेत्रातील समभागातील खरेदीमुळे(Malaysian Fabrication plants have returned back to normalcy and are now operating at 100% capacity ending the chip shortage.) बाजाराला थोडा सपोर्ट मिळाला. बाजाराची सुरुवातच निराशाजनक झाली दुपारनंतर बाजार रिकवर झाला परंतु वरच्या स्तरावर पुन्हा जोरदार विक्री झाली. मंगळवारी सरकारने विदेशी पर्यटकांसाठी travel visa च्या नियमात सूट दिली. ९९ देशांच्या पर्यटकांना quarantine होण्याची आता गरज नाही. मंगळवारी कच्च्या तेलाचे भाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये चार दिवसांच्या सर्वाधिक भावांवर पोहोचले होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३९६ अंकांनी घसरून ६०,३२२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी११० अंकांनी घसरून १७,९९९ चा बंद दिला.

सलग दुसऱ्या दिवशी बाजार खालच्या स्तरावर बंद.Market ends lower for second straight session

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरणीचा सिलसिला सुरूच राहिला. सेन्सेक्स व निफ्टी १/२ %पेक्षा अधिकने घसरून बंद झाले.बाजारात नफावसुली सुरू होती. अमेरिकेत रिटेल विक्रीचे आकडे मजबूत येऊन देखील ग्लोबल बाजारात जोश भरला नाही. वाढत्या महागाईमुळे बाजाराची चिंता वाढली आहे.इंग्लंड मधील वाढत्या महागाईमुळे गुंतवणूकदारांचा मूड खराब झाला आहे. ऑक्टोबर मध्ये तेथील महागाई ३.१% वरून ४.२% पर्यंत पोहोचली (Rising inflation in the UK—4.2 percent in October, up from 3.1 percent in the previous month). भारतीय बाजारासाठी सेमीकंडक्टरचा तुटवडा कमी होणार हि एक समाधानाची बाब ठरली व त्यामुळे निदान ऑटो सेक्टर मध्ये सकारात्मकता पसरली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३१४ अंकांनी घसरून ६०,००८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी१०० अंकांनी घसरून १७,८९८ चा बंद दिला.

नफावसुलीमुळे निफ्टी १८,००० च्या खाली. Profit booking drags Nifty below 18,000

जागतिक बाजाराच्या कमजोरीचा फटका गुरुवारी भारतीय बाजाराला बसला.बाजाराची सुरुवात सपाट झाली परंतु बाजारात प्रचंड नफावसुली झाली. जवळपास सगळ्या सेक्टर मध्ये घसरण झाली. देशातील सगळ्यात मोठा IPO PAYTM मध्ये लिस्टिंगच्या दिवशी प्रचंड घसरण झाली हे देखील बाजाराच्या पडझडीचे कारण ठरले, जागतिक बाजार वाढत्या महागाईमुळे चिंतित आहेत.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४३३ अंकांनी घसरून ५९,५७५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १३३ अंकांनी घसरून १७,७६४ चा बंद दिला.Good expectations for investors from the stock market

जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com

JS/KA/PGB

20 Nov 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *