माजी आमदार रमेश कदम यांची झाली सुटका

ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृहातून आज जामीना वर सुटले आहेत. त्यानंतर कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कोट्यवधी घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावरती आरोप होते. तब्बल 8 वर्षाच्या नंतर रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर आले आहेत. Former MLA Ramesh Kadam was released
यासाठी मुंबई, ठाणे, सोलापूर अशा विविध ठिकाणावरून मातंग समाज कार्यकर्ते जमले होते. रमेश कदम यांचे ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर मातंग समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आले.
बोरीवली या त्यांच्या निवासस्थानी ठिकाणी रवाना झाले आहेत.
रमेश कदम राष्ट्रवादीचे माजी आमदार होते 2014 त्यानंतर 2019 साली तुरुंगात असताना त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून लढवली होती.
रमेश कदम यांच्यावरती अण्णाभाऊ साठे विकास आर्थिक महामंडळ घोटाळा प्रकरणी अनेक आरोप आहेत.
ML/KA/PGB
20 Aug 2023