परकीय चलन साठ्यात झाली घट

 परकीय चलन साठ्यात झाली घट

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात (Forex Reserve) पुन्हा एकदा घट झाली आहे. 11 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात तो 1.763 अब्ज डॉलरने कमी होऊन 630.19 अब्ज डॉलर झाला आहे. मात्र या काळात सोन्याच्या साठ्याचे मूल्य वाढले आहे आणि 95.20 कोटी डॉलरने वाढून तो 40.235 अब्ज डॉलर झाला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. त्याआधी 4 फेब्रुवारी 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा (Forex Reserve) 2.198 अब्ज डॉलरने वाढून 631.953 अब्ज डॉलरवर गेला होता. विशेष म्हणजे 3 सप्टेंबर 2021 रोजी परकीय चलनाचा साठा 642.453 अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, 28 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 4.531 अब्ज डॉलरने घसरून 629.755 अब्ज झाला होता तर 21 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 67.8 कोटी डॉलरने घसरून 634.287 अब्ज डॉलर झाला होता.

आकडेवारीवर नजर टाकली तर, 11 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात (Forex Reserve) झालेली ही घसरण प्रामुख्याने विदेशी चलन मालमत्ता (FCA) मध्ये घट झाल्यामुळे झाली आहे, जी एकूण चलन साठ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की त्या आठवड्यात भारता़ची विदेशी चलन मालमत्ता 2.764 अब्ज डॉलरने घसरून 565.565 अब्ज डॉलर झाला आहे. डॉलरमध्ये सांगण्यात येत असलेल्या परकीय चलनाच्या साठ्यात युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा प्रभाव देखील समाविष्ट असतो. त्या आठवड्यात, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (MIF) मधील देशाचा पैसे काढण्याचा विशेष अधिकार 6.5 कोटी डॉलरने वाढून 19.173 अब्ज डॉलर झाला आहे.

India’s foreign exchange reserves have declined once again. For the week ended February 11, 2022, it fell by 7 1.763 billion to 30 630.19 billion. However, the value of gold reserves has increased during this period and increased by 95 95.20 billion to 40 40.235 billion.

PL/KA/PL/19 FEB 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *