ऊस बिलांच्या थकबाकीसाठी शेतकरी रस्त्यावर..

 ऊस बिलांच्या थकबाकीसाठी शेतकरी रस्त्यावर..

सांगली, दि. 18  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊस बिलाची थकीत एफ आर पी, रासायनिक खताचे वाढलेले दर, कृषी पंपाच्या वीज आणि पाणी बिलाची रक्कम इत्यादी प्रश्नावर सांगली जिल्ह्यातील उसकरी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चाने जात असताना पोलिसांशी त्यांची झटापट झाली.
आंदोलकांनी सरकारचा प्रतिकात्मक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी सदरचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. ऊसाच्या एकरकमी एफआरपी साठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला, यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्याच धुमचक्री झाली.

मूळ प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी विषयांतर करण्यात सरकारला रस आहे, महाविकास आघाडी सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे, एकमेकांवर चिखलफेक करून, सत्ताधारी आणि विरोधक जनतेच्या प्रश्नापासून लक्ष विचलित करत आहेत, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

 

HSR/KA/HSR/18 Feb  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *