थकीत वसुलीसाठी साखरेचा लिलाव सुरू…

 थकीत वसुलीसाठी साखरेचा लिलाव सुरू…

सांगली , दि. 19  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तासगाव साखर कारखान्याच्या थकीत एफआरपी वसुलीसाठी महसूलखात्या मार्फत साखर विक्रीची टेंडर काढून आरआरसीमार्फत कारवाई सुरू केली आहे. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये 14 हजार 940 पोती साखर शिल्लक आहे.

तासगाव आणि नागेवाडी येथील साखर कारखान्यांच्या ऊस बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. नागेवाडी कारखान्याकडील दोन वर्षाची तर तासगाव कारखान्याकडील एक वर्षाची बिले शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. तासगाव कारखान्याकडील 28 कोटी पैकी 17 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. शेतकरी संघटना गेली अनेकदिवस याप्रश्नी आंदोलन करीत आहे. त्यासाठी धनादेश दिले पण शेतकऱ्यांना रक्कम काही मिळू शकली नाही.

दरम्यान महसूल विभागाने आर आर सी कायद्या अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. एस जी झेड अंड शुगर युनिट 1 यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. ऊस बिल वसुलीसाठी केलेली जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.या कारखान्या तील 14 हजार 940 पोती साखरेचे लिलावासाठी नोटीस बजावण्यात आली. लिलाव प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी दिली.

 

ML/KA/HSR/19 Feb  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *