रशिया व युक्रेन मधील तणावामुळे बाजार( Stock Market) दिशाहीन

 रशिया व युक्रेन मधील तणावामुळे बाजार( Stock Market) दिशाहीन

सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांनी घसरणीचा सिलसिला सुरूच ठेवला. रशिया व युक्रेन या देशातील तणाव,कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि FII ची अथक विक्री या कारणांमुळे बाजारात अस्थिरता वाढली.त्याचप्रमाणे सोमवारी जाहीर झालेल्या किरकोळ महागाईच्या दरानी सात महिन्यांचा उच्चांक गाठला. अमेरिका व यु.के येथील महागाईने सुद्धा ३०/४० वर्षांचा उच्चांक गाठल्याने तेथील सेंट्रल बँकांवर व्याजदर वाढीसाठी दबाव आला.

परंतु या आठवड्याचा केंद्रबिंदू म्हणजे रशिया व युक्रेन या देशातील युद्धजन्य परिस्थिती ,अमेरिकन विदेश मंत्र्यांनी रशिया १६ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करेल असा दावा केल्याने जागतिक बाजारातील अस्थिरता प्रचंड वाढली अशातच रशियाने युक्रेनच्या आसपास १ लाख ३० हजार सैनिक तैनात केले,यामुळे जागतिक बाजरात मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसले.रशिया व अमेरिका येथील काही वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडिया वरील प्रत्येक बातमीचा परिणाम बाजारावर होताना दिसला बाजारात संपूर्ण आठवड्यात प्रचंड चढ उतार दिसले , बाजार तेजी व मंदी यामध्ये झुलत राहिला. भारतीय बाजरावर देखील याचा परीणाम दिसला त्याचप्रमाणे गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड झाल्याने बँकिंग सेक्टर मध्ये प्रचंड चढ उतार दिसले.

येणाऱ्या आठवडयात बाजाराचे लक्ष रशिया व युक्रेन मधील परिस्थितीकडे असेल. सोमवारी अमेरिकन व बुधवारी जपान व रशियातील बाजार बंद राहतील.मागे नमूद केल्याप्रमाणे दोन गोष्टी आपणास पाहावयास मिळाल्या, एक म्हणजे बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार व गेल्या दोन वर्षांप्रमाणे मोठ्या परताव्याची अपेक्षा न करणे. दिनांक १० मार्च रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी.

युक्रेन संकटामुळे बाजारात रक्तपात. Carnage on D-Street amid Ukraine crisis

खराब जागतिक संकेतांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड घसरण झाली. रशिया व युक्रेन या देशातील तणाव वाढल्याने सेन्सेक्स व निफ्टी कोसळले . दिवसभरात सेन्सेक्समध्ये १८०० तर निफ्टीत जवळपास ६०० अंकांची घसरण झाली. अमेरिकन विदेश मंत्र्यांनी रशिया १६ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करेल असा दावा केला. रशियाने युक्रेनच्या आसपास १ लाख ३० हजार सैनिक तैनात केले. या सगळ्यामुळे कच्च्यातेल्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. तसेच गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड झाला याचा परिणाम बँकिंग क्षेत्रावर झाला. या सगळ्याचा परिणाम बाजारावर झाल्याने बाजरात चौफेर विक्री झाली.निफ्टीत १० महिन्यातील सगळ्यात मोठी घसरण झाली.अमेरिकन व्याजदर वाढीची टांगती तलवार देखील बाजारावर होतीच.बँकिंग,रिअल इस्टेट,ऑटो,मेटल क्षेत्रात प्रचंड विक्री झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स १७४७ अंकांनी घसरून ५६,४०५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५३१ अंकांनी घसरून१६,८४२ चा बंददिला. Markets end lower for the second consecutive session amid global sell-off due to geopolitical tension between Russia and the West over Ukraine.

सोमवारी जाहीर झालेले किरकोळ महागाईच्या दरानी सात महिन्यांचा उच्चांक गाठला जानेवारीत हा दर ६.१ टक्क्यांवर पोहोचला तर घाऊक महागाईने १२. ९६ हा दर नोंदवला. Retail inflation rises to 6.01 per cent in January, breaches RBI’s comfort mark,WPI inflation eases to 12.96% in Jan

बाजाराचे दिमाखात पुनरागमन. Market bounces back in style

दोन दिवसांच्या विक्रीनंतर बाजाराने मंगळवारी चांगली उसळी घेतली रशिया व युक्रेन या देशातील तणाव थोडासा कमी झाल्याने बाजाराने जोरदार वापसी केली सेन्सेक्सने १८०० अंकांची उसळी घेतली व निफ्टीतही जवळपास ६०० अंकांची वाढ झाली.निफ्टीतील ५० पैकी ४८ व सेन्सेक्स मधील सगळ्या ३० शेअर्स मध्ये खरेदी झाली.कच्च्या तेल्याच्या किमतीतील नरमाईचा सुद्धा बाज्राच्या वाढीला हातभार लागला. बाजार बंद होताना सेन्सेक्स १७३६ अंकांनी वधारून ५८,१४२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५०९ अंकांनी वधारून१७,३५२ चा बंददिला.

युक्रेन संकटावरील अनिश्चिततेमुळे बाजारात अस्थिरता

बुधवारी सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात वरच्या स्तरावर दबाव पाहावयास मिळाला.बाजाराने संपूर्ण सत्रात प्रचंड चढ उतार दाखवले. दिवसभर बाजार वरच्या व खालच्या पातळीवर झुलत होता. युक्रेन संकटावरील अनिश्चिततेमुळे बाजारात अस्थिरता वाढली.. त्याचप्रमाणे यूकेमध्ये महागाईचा दर जानेवारीमध्ये 5.5 टक्क्यांपर्यंत 30 वर्षांच्या उच्चांकावर गेला ज्यामुळे बँक ऑफ इंग्लंडवर अपेक्षेपेक्षा लवकर आणखी व्याजदर वाढीसाठी दबाव आला. घसरलेल्या पाश्चात्य बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावर बाजार बंद होताना झटपट विक्री झाल्याने अधिक जाणवला.निफ्टी फार्मा वगळता सगळ्या क्षेत्रांचे निर्देशांक लाल रंगात बंद झाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १४५ अंकांनी घसरून ५७,९९६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३० अंकांनी घसरून१७,३२२ चा बंददिला.दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्स 573 अंकांनी तर निफ्टी 168 अंकांनी घसरला.

बाजार खालच्या स्तरावर बंद. Market ends lower

वीकली एक्सपायरी आणी युक्रेन संकटावरील अनिश्चितता यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा दिवसभर बाजार तेजी व मंदी यामध्ये झुलत राहिला. गुरुवारच्या सत्रात देखील प्रचंड चढउतार दिसले. सकाळच्या सकारात्मक सुरुवातीनंतर बाजार घसरला. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर सुद्धा दिसला. बाजार बंद होताना सेन्सेक्स १०४ अंकांनी घसरून ५७,८९२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १७अंकांनी घसरून१७,३०४ चा बंददिला.

सलग तिसऱ्या दिवशी बाजार घसरला

सलग तिसऱ्या दिवशी बाजार रशिया व युक्रेन या देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हेलकावे खाताना दिसला. जवळपास सगळ्या क्षेत्रात दबावाचे वातावरण होते.बाजार बंद होताना सेन्सेक्स ५९ अंकांनी घसरून ५७,८३२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १६अंकांनी घसरून१७,२७६ चा बंददिला.

 

जितेश सावंत (लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *