सलग चौथ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात घट

 सलग चौथ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात घट

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (foreign exchange reserves) सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 16 कोटी डॉलरने घसरून 635.667 अब्ज डॉलर झाला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, 10 डिसेंबरच्या आधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 7.7 कोटी डॉलरने घसरून 635.828 अब्ज डॉलर झाला होता. तर 3 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात, या चलन साठ्याने 642.453 च्या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला होता.

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) साप्ताहिक आकडेवारीनुसार, 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा (foreign exchange reserves) कमी होण्याचे कारण म्हणजे एकूण राखीव रकमेचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये (FCA) झालेली घट. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, परकीय चलन मालमत्ता या आठवड्यात 64.5 कोटी डॉलरने घसरून 572.216 अब्ज डॉलर झाली आहे.

डॉलरमध्ये सांगण्यात येत असलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या बिगर-अमेरिकन चलनाच्या चढ-उताराचाही समावेश होतो. या कालावधीत सोन्याच्या साठ्याचे मूल्य 47.5 कोटी डॉलरने वाढून 39.183 अब्ज डॉलर झाले. समिक्षेच्या आठवड्यात आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीकडील (IMF) पैसे काढण्याचा विशेष अधिकार 19.089 अब्ज डॉलरवर कायम राहिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये देशाचा चलन साठा 90 लाख डॉलरने वाढून 5.179 अब्ज डॉलर झाला आहे.

The country’s foreign exchange reserves have been declining for the fourth week in a row. For the week ended December 17, the country’s foreign exchange reserves fell by 16 million to 635.667 billion, according to the Reserve Bank of India.

PL/KA/PL/25 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *