प्रचंड घसरणीनंतर भांडवली बाजार (Stock Market) सावरला.

 प्रचंड घसरणीनंतर भांडवली बाजार (Stock Market) सावरला.

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत,  बाजाराची मागील आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. एप्रिल २०२१ नंतरची सगळ्यात मोठी घसरण अशी नोंद झाली.मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने १६,४०० चा स्तर गाठला. परंतु बाजाराने चांगलेच कमबॅक केले.आठवड्याच्या शेवटच्या दिवशी निफ्टीने १७,१५० पर्यंतचा टप्पा गाठला. After a sharp fall, the stock market recovered. शेवटच्या दिवशी बाजारात नफावसुली झाली.ओमिक्रॉनचा वाढत प्रभाव, अनेक युरोपियन देशांनी नव्याने लावलेले प्रतिबंध,(FII) विदेशी गुतंवणूकदारांची जोरदार विक्री, जगातील काही प्रमुख सेंट्रल बँकांनी उचललेली कडक पावले व महागाईत झालेली वाढ ही बाजार कोसळण्याची प्रमुख कारणे ठरली. परंतु यूएसच्या तिमाही GDP मधील वाढ तसेच एका अहवालानुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची तीव्रता आणि हॉस्पिटलायझेशनचा धोका कमी झाल्याची बातमी,फायझर कंपनीच्या कोरोनावरील गोळीला मिळालेली मान्यता(Pfizer oral Covid-19 pill gets US authorization) व रुपयातील घसरणीला लागलेला ब्रेक यामुळे बाजारातील सकारात्मकता वाढली.

या आठवड्यात निफ्टीने १७,००० चा आपला भक्कम स्तर तोडून १६,४०० चा स्तर गाठला परंतु आठवड्याच्या शेवटच्या दिवशी १७,१५० पर्यंत मजल मारली येणाऱ्या काळात निफ्टीसाठी १६,९००-१६,८०० हे महत्वाचे स्तर आहेत. तसचे वरती जाण्याकरिता १७,२०० चा स्तर अत्यंत महत्वाचा आहे.

येणाऱ्या आठवडयात गुंतवणूकदारांचे लक्ष डिसेंबर महिन्याची एक्सपायरी(monthly expiry),विदेशी गुंतवणूकदारांचे((FII) खरेदी/विक्रीचे आकडे,रुपयाची वाटचाल या कडे असेल.तसेच नवीन वर्षाच्या स्वागताकरिता बरचसे जागतिक बाजार बंद राहतील.

सेन्सेक्स १,८०० अंकांनी कोसळला बाजारासाठी ठरला काळा दिवस. (Black Monday)

भारतीय बाजारासाठी सोमवारचा दिवस अक्षरशः काळा ठरला (Black Monday). सेन्सेक्स १८०० अंकांनी गडगडला ,मार्केट घायाळ झाल. एप्रिल २०२१ नंतरची सगळ्यात मोठी घसरण झाली.सोमवारी चीनने २०२० एप्रिल नंतर प्रथमच लेंडिंग रेट मध्ये कपात केली त्यामुळे बाजारावर दबाव वाढला ,त्याशिवाय ओमिक्रॉनचा वाढत प्रभाव, अनेक युरोपियन देशांनी नव्याने लावलेले प्रतिबंध,(FII) विदेशी गुतंवणूकदारांची जोरदार विक्री,तसेच जगातील काही प्रमुख सेंट्रल बँकांनी उचललेली कडक पावले. या सगळ्याच्या परिणाम बाजारावर साफ दिसला.सगळ्या क्षेत्रातील समभागात घसरण झाली. दुपारी सेन्सेक्स १,८४९ अंकांनी म्हणजेच ३.२४% घसरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स १,१८७ अंकांनी घसरून ५५,८२२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ३७१ अंकांनी घसरून १६,६१४ चा बंददिला. Sensex, Nifty Log Second Worst Day In Eight Months.

दोन दिवसांच्या पडझडीनंतर बाजाराची दमदार वापसी. Market rebounds after 2-day freefall

दोन दिवसांच्या पडझडीनंतर बाजाराने चांगलेच कमबॅक केले. आदल्या दिवशीच्या प्रचंड घसरणीनंतर सुद्धा जागतिक बाजरातील तेजीच्या जोरावर तसेच यू.एस फ्युचरच्या मजबूत संकेतामुळे मंगळवारी सेन्सेक्सने दमदार वापसी केली. सेन्सेक्स १,००० अंकांपेक्षा जास्त वाढला.ITआणी metal क्षेत्राने या वाढीत भर घातली.दिवसभरात सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ५६,९०० व १६,९३६ चा इंट्राडे हाय नोंदवला. या पातळीवरून बाजारात नफावसुली झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४९७ अंकांनी वधारून ५६,३१९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५६ अंकांनी वधारून १६,७७१ चा बंददिला. Markets break the two-day losing streak and end higher with Nifty above 16,700 level.

सेन्सेक्सची ६०० अंकांची उसळी. Sensex up 612 points

जागतिक बाजारातील तेजीच्या जोरावर सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली. मिडकॅप तसेच स्मॉलकॅप समभागात खरेदीचा ओघ होता. RIL, ICICI Bank, bajaj Finance आणि infosys या समभागातील तेजीने सेन्सेक्सला ६०० अंकांची उसळी घेण्यास भाग पाडले.वीकली एक्सपायरीच्या अगोदर सेन्सेक्स व निफ्टी १% वाढले. सेन्सेक्स ६१२ अंकांनी वधारून ५६,९३१ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १८५ अंकांनी वधारून १६,९९५ चा बंददिला.

जागतिक बाजारात सकारात्मकता निफ्टी १७,००० च्या वरती. Nifty above 17,000 supported by the positive global cues.

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी पसरली.जागतिक बाजारातील सकारात्मक कामकाजामुळे भारतीय बाजाराची सुरुवात तेजीने झाली. दिवसभर बाजार तेजी टिकवण्यात यशस्वी झाला. वरच्या स्तरावर नफावसुली झाली परंतु बाजाराने बंद होताना १७,००० स्तर टिकवला.PSU bank, realty, FMCG, oilआणी gas व power क्षेत्रतील समभागात तेजी होती. यूएसचा तिसरा तिमाही GDP वाढला(US third quarter GDP expanded), जो अपेक्षेपेक्षा जास्त होता.अमेरिकेत एका अहवालानुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची तीव्रता आणि हॉस्पिटलायझेशनचा धोका कमी झाल्याची बातमी आल्याने बाजारातील सकारात्मकता वाढली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३८४ अंकांनी वधारून ५७,३१५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ११७ अंकांनी वधारून १७,०७२चा बंददिला. Markets rally for the third straight trading session as investors pinned hopes of a possible year-end rally, despite the Omicron threat.

सेन्सेक्समध्ये १९१ अंकांची घसरण. Sensex slips 191 points

सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात नफावसुली पाहावयास मिळाली. बाजारातील दिग्गज समभागांसोबत छोट्या समभागात देखील विक्री झाली. bank, realty,power क्षेत्रात विक्रीचा जोर होता. IT वगळता बाकी क्षेत्र लाल रंगात बंद झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स १९१ अंकांनी घसरून ५७,१२४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६९ अंकांनी घसरून १७,००३ चा बंददिला. Sensex, Nifty end lower amid volatility.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

25 Dec 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *